नंदुरबार जिल्ह्यात 10 हजार घरांचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 12:42 IST2018-05-07T12:42:37+5:302018-05-07T12:42:37+5:30

प्रधानमंत्री आवास योजना : गावनिहाय लक्षांक निर्धारित करण्याचे आदेश

Objective of 10 thousand houses in Nandurbar district | नंदुरबार जिल्ह्यात 10 हजार घरांचे उद्दिष्ट

नंदुरबार जिल्ह्यात 10 हजार घरांचे उद्दिष्ट

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 7 : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेतून यंदा जिल्ह्यात 10 हजार घरकुलांचे उद्दिष्टय़ देण्यात  आले असून, संबंधित पंचायत समित्यांना गावनिहाय लक्षांक निर्धारित करून कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हा परिषदेमार्फत देण्यात आले आहे. दरम्यान गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी घरकुलांची संख्या वाढविण्यात आल्याने ग्रामीण लाभार्थ्ीनी समाधान व्यक्त केले        आहे.
अनुसूचित जाती-जमातींबरोबरच दारिद्रय़ रेषेखालील इतर गरीब गरजू घटकांना केंद्र शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ गेल्या 35 ते 40 वर्षापासून देण्यात येत आहे. या योजनेतून साधारण एक लाख 20 हजार रुपयांचे घरकुल संबंधीत लाभार्थीना त्यांच्या स्वत:च्या जागेवर बांधून देण्यात येत असते. केंद्र शासनाच्या या घरकुलासाठी लाभाथ्र्यानी साधारण अडीच हजार रुपयानचा हिस्सा टाकायचा असतो. सदर योजनेमुळे गरीबाला स्वत:चे हक्काचे घरकुल मिळत असते. यंदाही केंद्रशासनातर्फे नंदुरबार जिल्ह्यासाठी साधारण 10 हजार 348 घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यात अक्कलकुव्यासाठी दोन हजार 311, धडगावसाठी दोन हजार 178,  शहादासाठी एक हजार 859, नवापूरकरीता एक हजार 878, तळोद्याला एक हजार 44 व नंदुरबारसाठी 776 याप्रमाणे तालुक्यानुसार लक्षांक देण्यात आला आहे. सर्वात जास्त अक्कलकुवा तर त्याखालोखाल धडगाव तालुक्याला दिले आहे. हे दोन्ही तालुके पूर्णत: आदिवासी तालुके असल्यामुळे त्यांना जास्त उद्दिष्ट दिल्याचे सांगण्यात आले आहे. 
संबंधित पंचायत समितीच्या प्रशासनाने गाव नुसार घरकुलांची संख्या निर्धारित करून पुढील कार्यवाहीसाठी तातडीने जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठविण्याची सूचनादेखील जिल्हा परिषद प्रशासनाने गटविकास अधिका:यांना दिले आहे. या शिवाय लाभाथ्र्याचे घरकुल मंजूर झाल्याबरोबर त्यांच्याकडून वर्षभरात घरकुल तयार करून घेण्याच्या सूचना देखील पंचायत समिती प्रशासनास देण्यात आल्या आहेत, असे असले तरी लाभार्थ्ीनी आपापले घरकूल पूर्ण करण्यासाठी ठोस प्रय} करण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा शासनाने घरकुलांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढविल्यामुळे आदिवासी लाभार्थ्ीनी समाधान व्यक्त केले आहे. 
शासनाच्या उद्दिष्टानंतर अनुसूचित जमातीसाठी दहा हजार 39, अनुसूचित जातीसाठी 41 व इतर दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबांकरीता 267 असे नियोजन करण्यात आले आहे.
 

Web Title: Objective of 10 thousand houses in Nandurbar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.