रामपूर प्लॉट येथे पोषण आहार प्रदर्शन व रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:31 IST2021-09-03T04:31:46+5:302021-09-03T04:31:46+5:30
या कार्यक्रमाचे उद्घाटन एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी शेख यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नीती आयोगाचे साईनाथ, डॉ. शेल्टे, पर्यवेक्षिका ...

रामपूर प्लॉट येथे पोषण आहार प्रदर्शन व रॅली
या कार्यक्रमाचे उद्घाटन एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी शेख यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नीती आयोगाचे साईनाथ, डॉ. शेल्टे, पर्यवेक्षिका संगीता खेडकर, म्हसावद प्रकल्पातील पर्यवेक्षिका अश्विनी करंके प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी किशोरी मुली, गरोदर माता, स्तनदा माता यांचा शेवग्याची रोपे देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी प्रतिज्ञा घेण्यात आली. त्यांना आरोग्यविषयक व आहाराबाबत तसेच स्तनपान, स्वच्छता, लसीकरण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर गावात जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी अंगणवाडी सेविका विमल पावरा, पुष्पा खर्डे, प्रियंका पटले, रत्ना पाटील, पवित्रा पाटील, कल्पना पाटील, संगीता ब्राम्हणे, आशा पावरा व महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमास सरपंच, पोलीस पाटील, शिक्षक व ग्रामस्थांनी सहकार्य केले.