डॉक्टरांची संख्या अवघी दीड टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 12:22 IST2020-06-15T12:21:55+5:302020-06-15T12:22:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी स्वत: काळजी घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यात खाजगी डॉक्टरांची ...

The number of doctors is only one and a half percent | डॉक्टरांची संख्या अवघी दीड टक्के

डॉक्टरांची संख्या अवघी दीड टक्के

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी स्वत: काळजी घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यात खाजगी डॉक्टरांची संख्या एकुण लोकसंख्येच्या अवघी एक ते दीड टक्का आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेल्यास मोठ्या समस्येला सामोरे जावे लागेल असे मत आदिवासी डॉक्टर असोसिएशनचे अर्थात माडाचे अध्यक्ष डॉ.राजेश वळवी यांनी व्यक्त केले.
कोरोनासंदर्भात आदिवासी डॉक्टर असोसिएशन व आयएमएने प्रशासनाला सहकार्य केले आहे. या संदर्भात डॉ.राजेश वळवी यांनी सांगितले, जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढला आहे. पाच दिवसात २१ रुग्ण आढळून आले आहेत. यातील ९० टक्के रुग्ण हे बाहेरगावाहून संपर्क झालेले आहेत. त्यामुळे लॉकडाऊनमधून मिळालेली सूट, प्रवासात मिळालेली सूट लक्षात घेता येत्या काळात आणखी सतर्क राहावे लागणार आहे.
बाहेर गावाहून आलेल्या प्रत्येकाने आरोग्य विभागाला माहिती देणे आवश्यक आहे. नागरिकांनीही बाहेर निघतांना आवश्यक त्या सर्व खबरदारी घेणे देखील गरजेचे आहे. जिल्ह्यातील एकुण खाजगी रुग्णालये व डॉक्टरांची संख्या लक्षात घेता एकुण लोकंख्येच्या अवघी एक ते दीड टक्के इतकी आहे. त्यामुळे शासकीय आरोग्य यंत्रणेवर किती आणि कसा ताण राहील याचा प्रत्येकाने विचार करावा.
जिल्ह्यातील रहिवासी असलेल्यांचीच नोंद येथील कोरोनाबाधीतांमध्ये घेणे देखील आवश्यक आहे. नाशिक येथे डिटेक्ट झालेले पेशंट नंदुरबारला पाठविण्यात आलेले आहेत. त्यामुळे नंदुरबार जिल्हा प्रशासनाने देखील याबाबत दक्ष राहावे अशी अपेक्षाही डॉ.राजेश वळवी यांनी व्यक्त केली.

Web Title: The number of doctors is only one and a half percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.