लसीकरणासाठी उजाडेल डिसेंबर तेव्हाच लागेल सर्वसामान्यांचा नंबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:59 IST2021-02-18T04:59:22+5:302021-02-18T04:59:22+5:30

नंदुरबार जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. नोंदणी केलेल्या १२ हजार ७०१ पैकी आठ हजार जणांचे लसीकरण पूर्ण ...

The number of common people will be available only when December dawns for vaccination | लसीकरणासाठी उजाडेल डिसेंबर तेव्हाच लागेल सर्वसामान्यांचा नंबर

लसीकरणासाठी उजाडेल डिसेंबर तेव्हाच लागेल सर्वसामान्यांचा नंबर

नंदुरबार जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. नोंदणी केलेल्या १२ हजार ७०१ पैकी आठ हजार जणांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. लसीकरणाचा वेग वाढवा यासाठी आठ केंद्रांची निर्मिती आरोग्य विभागाने केली असून येत्या आठवड्यात आणखी दोन ठिकाणी लसीकरणाला प्रारंभ करण्यात येणार आहे. तूर्तास जिल्हा रुग्णालय, नंदुरबार पालिकेचे जेपीएन रुग्णालय, तळोदा व नवापूर उपजिल्हा रुग्णालय, शहादा, अक्कलकुवा व म्हसावद ग्रामीण रुग्णालयात लसीकरण सुरू करण्यात आले आहे. जानेवारी मध्यापासून सुरू झालेल्या लसीकरणाचा वेग चांगला असल्याने जिल्ह्यातील १७ लाख नागरिकांपर्यंत लस लवकरच पोहोचणार अशी अपेक्षा होता. परंतु ४० दिवसात लसीकरणाचा वेग कमी झाल्याने चिंता निर्माण झाली होती. यावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाने वाढीव केंद्र निर्मिती आणि लसीकरण करण्यासाठी कर्मचाऱ्यांची जादा नियुक्ती असे धोरण स्वीकारल्याने सध्या आठपैकी पाच केंद्रांवर १०० टक्के लसीकरण होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. ही गती कायम ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान जिल्हा आरोग्य विभागाला जानेवारी महिन्यात १२ हजार आणि नंतरच्या काळात १० हजार डोस उपलब्ध करून देण्यात आले होते. या डोससाठी नोंदणी केलेल्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. दरम्यान त्यांना दर दिवशी डोस दिले जात आहेत. दिवसाला ८५ टक्के नोंदणीकृत कर्मचारी व आशा, अंगणवाडी सेविका यांचे लसीकरण होत आहे. २८ दिवस पूर्ण झाल्याने अनेकांचा दुसरा टप्पाही पूर्ण करण्यात आला आहे. तब्बल ९ हजार ९३८ जणांना कोरोना लस देण्यात आल्याचे समोर आले आहे. येत्या आठवड्यात पहिल्या टप्प्यातील लसीकरण पूर्ण होईल.

दहा दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

जिल्ह्यात लसीचे डोस उपलब्ध झाले असताना दुसरीकडे जानेवारी महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. परंतु १ फेब्रुवारीपासून रुग्णांच्या संख्येत घट आल्याचे दिसून आले आहे. गेल्या १० दिवसात १४४ रुग्ण वाढल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात येत्या काळात शासकीय यंत्रणांचे लसीकरण झाल्यावर प्रथम ५० वर्षावरील व्यक्तींचे लसीकरण होण्याचा संभव आहे.

Web Title: The number of common people will be available only when December dawns for vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.