मुंबई, पुणे व पंढरपूरसाठी आता दररोज एस.टी.बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 12:41 IST2020-09-09T12:41:31+5:302020-09-09T12:41:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : येथील राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगारातर्फे प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज पंढरपूर, मुंबई, पुणे या लांब ...

मुंबई, पुणे व पंढरपूरसाठी आता दररोज एस.टी.बस
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : येथील राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगारातर्फे प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज पंढरपूर, मुंबई, पुणे या लांब पल्ल्याच्या एसटी बस सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन धुळे विभागीय नियंत्रक मनिषा सपकाळ आणि नंदुरबार आगार प्रमुख मनोज पवार यांनी केले आहे.
कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन काळात गेल्या सहा महिन्यापासून बंद असल्याने प्रवाशांची जीवनवाहिनी ठरलेली एसटी अर्थात लालपरी पुन्हा नव्या जोमाने धाऊ लागली आहे. नंदुरबार आगारातून बुधवार दिनांक ९ सप्टेंबर पासून लांब पल्ल्याच्या तीन नवीन एसटी बसेस सुरू करण्यात आल्या आहेत.
यात दररोज पहाटे पाच वाजता नंदुरबार-पंढरपूर, सकाळी सात वाजता नंदुरबार - मुंबई , सकाळी आठ आणि दहा वाजता नाशिकमार्गे नंदुरबार-पुणे एसटी बसेस सुरू करण्याचे आदेश प्राप्त झाल्याने नंदुरबार आगारातर्फे आजपासून नियमित सेवा उपलब्ध आहे.
याचबरोबर सकाळी सात वाजता मुंगबारीमार्गे नंदुरबार- नाशिक, आणि सटाणामार्गे नंदुरबार - नाशिक सकाळी सहा, साडेसात, आठ, ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत दर एका तासात अशा १२ फेऱ्या सुरू आहेत. दुपारी दोन वाजता नंदुरबार - जळगाव, सकाळी साडेसात वाजता नंदुरबार - शिरपूर तसेच नंदुरबार - धुळे साठी दर तासाला अशा दा फेºया सध्या सुरू आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक बस मध्ये किमान २२ प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा राहील.