पुर ओसरल्यानंतर आता आरोग्याचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 12:24 IST2019-08-19T12:24:08+5:302019-08-19T12:24:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : पावसामुळे शहरात ठिकठिकाणी मोठ-मोठे डबके साचले असल्यामुळे डासांचाही प्रचंड प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी साथींचा ...

Now the question of health after the flood | पुर ओसरल्यानंतर आता आरोग्याचा प्रश्न

पुर ओसरल्यानंतर आता आरोग्याचा प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : पावसामुळे शहरात ठिकठिकाणी मोठ-मोठे डबके साचले असल्यामुळे डासांचाही प्रचंड प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी साथींचा रुग्णांमध्येदेखील वाढ झाली आहे. सरकारी बरोबरच खाजगी दवाखाने अशा रुग्णांनी हाऊस फूल होत असल्याचे चित्र आहे. संबंधीत आरोग्य विभाग व पालिका प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
गेल्या 15 दिवसांपासून शहराबरोबरच संपूर्ण तालुक्यात पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहरात सर्वच भागात ठिकठिकाणी मोठ-मोठे डबके साचले आहेत. परिणामी डासांचीदेखील मोठय़ा प्रमाणात उत्पत्ती वाढली आहे. डासांच्या या वाढत्या प्रादुर्भावामुळे मलेरिया, टाईफाईड, थंडी, ताप, खोकला, अशा साथीच्या आजारांच्या रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. उपचारासाठी रुग्ण दवाखान्यामध्ये दाखल होत असल्यामुळे दवाखानेही हाऊस फुल्ल झाले आहेत. काही ठिकाणी रुग्णांना बसायला जागा मिळत नसल्याने अक्षरश: दवाखान्याबाहेर रांगेत, ताटकळत उभे राहावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आधीच 15 दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत असल्यामुळे घरोघरी ताप, थंडी, खोकला, सर्दीचे रुग्ण असल्याचे म्हटले जात आहे. दवाखान्यात डॉक्टरांकडून एकदा उपचार घेऊन तात्पुरता दोन दिवस बरे झाल्यानंतर पुन्हा सर्दी, ताप, खोकल्याची               लागन होत असल्यामुळे शहरवासीय अक्षरश: वैतागले आहेत. साथीच्या वाढत्या रोगांमुळे कुटुंबांना             आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
वास्तविक शहरात मोठय़ा प्रमाणात थंडी, ताप, सर्दीची साथ पसरत असतांना त्यावर उपाययोजना करण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभाग व शासनाच्या आरोग्य विभागाने साफ दुर्लक्ष केल्याचा नागरिकांचा आरोप आहे. या दोन्ही यंत्रणांनी घरोघरी जावून अशा रुग्णांची रक्त तपासणी, औषधोपचार करण्याची अपेक्षा आहे. शहरात शासनाचे मोठे उपजिल्हा रुग्णालय असले तरी तेथे  वैद्यकीय अधिका:यांची संख्या कमी असल्यामुळे रुग्णांना तत्काळ उपचार मिळत नाही. त्यामुळे गरीब रुग्णांना नाईलाजास्तव बाहेरील खाजगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत असून, यात आर्थिक फटका बसत असल्याची व्यथा काही नातेवाईकांनी बोलून दाखविली. संबंधीत यंत्रणांच्या वरिष्ठ प्रशासनाने दखल घेऊन उपाययोजना करण्याबाबत संबंधीतांना  सक्त ताकीद द्यावी, अशी मागणी आहे.

शहरातील डासांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील नगरपालिकेने गेल्या दोन वर्षापूर्वी दोन-अडीच लाखांचे धुरळणी यंत्र खरेदी केले आहे. मात्र त्याचा वापर होण्या ऐवजी ते अक्षरश: धुळखात पडल्याचे नागरिक सांगतात. वास्तविक शहरात बहुतेक ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे मोठ-मोठे डबके साचले आहेत. पालिका हद्दीतील सर्वच नवीन वसाहतींमध्ये तर गटारी व पक्के रस्त्यांअभावी अक्षरश: तलावच भरले आहेत. त्यामुळे तेथे दरुगधी पसरली आहेच. परंतु डासांची उत्पत्तीदेखील वाढली आहे. या पाश्र्वभूमिवर पालिकेकडून धुरळणीची मोहीम राबविणे गरजेचे आ9ह. मात्र या कडे खुद्द पालिकेच्या प्रशासनाबरोबर पदाधिका:यांनीही साफ दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.
 

Web Title: Now the question of health after the flood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.