प्रकाशात मृतदेहांवर आता करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:30 AM2021-04-16T04:30:27+5:302021-04-16T04:30:27+5:30

लोकमत इफेक्ट प्रकाशा : येथील तापी नदी काठावरील स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी फक्त चौथऱ्याचाच वापर करावा अन्यत्र कुठेही अंत्यविधी करू ...

Now look at the corpses in the light | प्रकाशात मृतदेहांवर आता करडी नजर

प्रकाशात मृतदेहांवर आता करडी नजर

Next

लोकमत इफेक्ट

प्रकाशा : येथील तापी नदी काठावरील स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी फक्त चौथऱ्याचाच वापर करावा अन्यत्र कुठेही अंत्यविधी करू नये, तसेच कोरोनाचे लक्षण दिसणाऱ्या मृतदेहांना प्रकाशा येथे आणू नये, अशा सूचना प्रकाशा ग्रामपंचायत, महसूल विभाग, पोलीस प्रशासन यांच्याकडून करण्यात आलेल्या आहेत व तेथे एक वॉचमन ठेवला असून त्यालादेखील सूचना करण्यात आलेल्या आहेत. तसेच तापी नदी घाट स्वच्छ करण्यात आला आहे.

‘लोकमत’ने बुधवारी कोरोनाबाधित मृतदेह हे प्रकाशा येथे अंत्यसंस्कारासाठी आणले जात असल्याची बातमी प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेत प्रकाशा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी बी.जी. पाटील, सरपंच सुदाम ठाकरे, मंडळ अधिकारी मुकेश चव्हाण, तलाठी धर्मराज चौधरी, प्रकाशा पोलीस दूर क्षेत्राचे सुनील पाडवी, विकास शिरसाठ, अजित नागलोद, प्रकाशा ग्रामपंचायतचे कर्मचारी यांनी भेट दिली व स्वच्छता कामगारांकडून परिसर स्वच्छ करण्यात आला व तेथे एक वॉचमन ठेवला असून त्यालाच सांगण्यात आले की आलेल्या मृतदेहांवर इतरत्र कुठेही न होता फक्त नेमून दिलेल्या जागी चौथऱ्यावर अंत्यविधी झाले पाहिजेत. तसेच कोरोनाबाधित किंवा लक्षण असलेले मृतदेह प्रकाशा येथे आणू नयेत, अशी सूचना प्रकाशा ग्रामपंचायतीने दिली आहे.

विलगीकरण कक्षामध्ये कोरोना रुग्णांना आणले

प्रकाशा ग्रामपंचायत व महसूल विभाग यांनी पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने कोरोनाबाधित रुग्णांना घरी जाऊन त्यांना समज देत त्यांना सद्गुरू धर्मशाळेच्या विलगीकरण कक्षामध्ये आणले आहे. त्यात दोन पुरुष व चार महिलांचा समावेश आहे, अशी माहिती स्वतः तलाठी धर्मराज पाटील यांनी दिली.

ग्रामपंचायतीकडून दुकानदारांना सूचना

प्रकाशा ग्रामपंचायत, महसूल विभाग व पोलीस प्रशासन यांनी गावात फिरून किराणा दुकानदार यांना समजावून सांगितले की, जर यापुढे आपल्या दुकानावर गर्दी जास्त दिसल्यास आपले दुकान सील करण्यात येईल. कोरोनाचे सर्व नियम आपण पाळायचे आहेत नियमांकडे दुर्लक्ष केल्यास कारवाई करण्यात येईल, अशा सूचना दुकानदारांना देण्यात आल्या आहेत.

फोटो कॅप्शन

प्रकाशा येथील स्मशानभूमीमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी करताना व स्वच्छता करून घेतानाच सुदाम ठाकरे, बी.जे. पाटील, धर्मराज चौधरी, सुनील पाडवी आदी.

नरेंद्र गुरव

Web Title: Now look at the corpses in the light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.