आता कोरोनाची जनजागृती होणार आदिवासी बोलीभाषेतून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 10:16 IST2020-05-14T10:16:28+5:302020-05-14T10:16:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचे प्रबोधन करण्यासाठी जिल्हा परिषदेत लोकसमन्वय प्रतिष्ठान व लोकसंघर्ष ...

Now Corona will be popularized through tribal dialects | आता कोरोनाची जनजागृती होणार आदिवासी बोलीभाषेतून

आता कोरोनाची जनजागृती होणार आदिवासी बोलीभाषेतून

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचे प्रबोधन करण्यासाठी जिल्हा परिषदेत लोकसमन्वय प्रतिष्ठान व लोकसंघर्ष मोर्चातर्फे तयार करण्यात आलेल्या भिली व पावरी भाषेतील पोस्टर्सचे प्रकाशन मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते करण्यात आले़
यावेळी लोकसमन्वयचे संजय महाजन, निशांत मगरे, महेंद्र पाटील उपस्थित होते़ कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे देशभरात लॉकडाऊनचे पालन सुरु आहे़ कोरोनाचा मुकाबला करताना सर्व व्यवहार ठप्प झाल्याने सर्वसामान्य जनतेचे दैनदिन जीवनही विस्कळीत झाले आहे़ त्यामुळे तोंडावर आलेला शेती हंगाम, जंगलातील वनउपज गोळा करण्याचा हंगाम बंद पडला आहे़ हाताला काहीच काम नसल्याने रोजगार हमीची कामे सुरु करण्यात येणार आहेत़ यासाठी सातपड्याच्या गावपाड्यातील आदिवासी बांधव बाहेर पडणार आहेत़ त्यांना कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी त्यांना शासनाने जाहीर केलेले नियम व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे़ हे लक्षात घेवून लोकसमन्वय प्रतिष्ठान व लोकसंघर्ष मोर्चातर्फे आदिवासी क्षेत्रात व बोली भाषेतून प्रबोधन करण्यासाठी चार पोस्टर्स तयार करुन त्याचा सेट प्रत्येक गावात लावण्यात येणार आहे़ यातून स्थानिक बोलीभाषेचा वापर करुन सूचना करण्यात आल्या आहेत़

यात कोरोना आजार, लक्षणे, घ्यावयाची काळजी, मास्क वापरतांना घ्यावयाची काळजी कामावर जाताना कायम नियम पाळावेत या विषयी सोप्या व छोट्या वाक्यांमध्ये चित्रांसह पावरी तसेच भिली/भिलोरी भाषेत माहिती दिली आहे़ सामुहिक वन व्यवस्थापनाची कामे सुरु असलेल्या गावांमध्ये व संस्थेच्या आणि संघटनेच्या धडगांव, तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील कार्यक्षेत्रात ७० गावांमध्ये हे पोस्टर्स सार्वजनिक ठिकाणी तसेच सरकारी कार्यालयांमध्ये लावले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे़

Web Title: Now Corona will be popularized through tribal dialects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.