कोरडी प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाची अधिसूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 12:05 IST2019-05-10T12:05:38+5:302019-05-10T12:05:44+5:30
नंदुरबार : नवापुर तालुक्यातील कोरडी मध्यम प्रकल्पासाठी चार गावांच्या ७९ शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी यांनी काढली आहे़ ...

कोरडी प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाची अधिसूचना
नंदुरबार : नवापुर तालुक्यातील कोरडी मध्यम प्रकल्पासाठी चार गावांच्या ७९ शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी यांनी काढली आहे़ अधिग्रहण प्रस्तावावर एकही हरकत न आल्याने जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी ही अधिसूचना काढली आहे़
नवापुर तालुक्यातील कोरडी मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालवा क्रमांक चार साठी जमीन संपादनाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे संबधित यंत्रणेने दिला होता़ मळवाण, मेंदीपाडा, सागाळी, श्रावणी या चार गावांमध्ये १५ हेक्टर ८११ आर क्षेत्र निर्धारित करण्यात आले होते़ यासाठी जानेवारी २०१८ मध्ये अधिसूचना काढण्यात आली होती़ दरम्यानच्या काळात यावर कोणीही हरकत घेतली नाही़ यामुळे प्रशासनाने या जमिनींचे अधिग्रहण करण्याचे प्रस्ताव तयार करत अधिसूचना काढली आहे़ चारही गावातील ७९ शेतकऱ्यांच्या या जमिनी असून त्यांना जमीन अधिनियम २०१३ च्या तरतूदीनुसार मोबदला देण्याच्या कामांना वेग आला आहे़ येत्या काळात शेतकºयांच्या जमिनींचे भूसंपादन पूर्ण होणार आहे़
जिल्हाधिकारी यांनी नवापुर तालुक्यासोबतच नंदुरबार तालुक्यात चौपाळे लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या मुख्य कालव्यावरील एस्केप चॅनलला हिरवी झेंडी दिली आहे़ यानुसार एकूण चार शेतकºयांचे ३५ गुंठे क्षेत्र अधिग्रहीत करण्याची अधिसूचना काढली गेली आहे़ शेतकºयांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होऊन लाभ क्षेत्रातील शेतकºयांच्या आर्थिक स्थितीत आर्थिक सुधारणा होण्याच्या हेतूने जमिन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ जिल्हाधिकाºयांनी दोन्ही कालव्याचा प्रश्न मार्गी लावल्याने नंदुरबार आणि नवापूर तालुक्यातील शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे़