गावशिवारात अवैध वाळू उत्खनन झाल्यास सरपंच आणि पोलीस पाटलाविरोधातच निघणार नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 11:56 IST2019-09-04T11:56:31+5:302019-09-04T11:56:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गौण खनिजाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी भरारी पथके नेमून कठोर कारवाई करावी तसेच अवैध वाळू ...

Notice issued against Sarpanch and police Patil against illegal sand mining in village | गावशिवारात अवैध वाळू उत्खनन झाल्यास सरपंच आणि पोलीस पाटलाविरोधातच निघणार नोटीस

गावशिवारात अवैध वाळू उत्खनन झाल्यास सरपंच आणि पोलीस पाटलाविरोधातच निघणार नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गौण खनिजाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी भरारी पथके नेमून कठोर कारवाई करावी तसेच अवैध वाळू उत्खनन होत असल्याचे दिसून आल्यास त्या गावातील सरपंच, पोलीस पाटील आणि कोतवाल यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात नोटीस देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी दिल़े जिल्हाधिकारी कार्यालयात गौण खनिज दक्षता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
बैठकीस प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, पोलीस उपअधीक्षक सिताराम गायकवाड, जिल्हा खनिकर्म अधिकारी रोहिणी चव्हाण आदी उपस्थित होते. 
वाळू वाहतूक होणा:या जिल्ह्यातील प्रमुख तीन मार्गावर महसूल आणि पोलीस कर्मचा:यांची पथके नेमण्यात यावी, शहादा आणि नवापूर तालुक्यात खनिकर्म अधिका:यांनी आवश्यक पथकासह भेट देऊन पाहणी करावी आणि गावात अवैध उत्खनन होत असल्याचे आढळल्यास गावातील संबंधित कर्मचा:यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी बैठकीत दिले आहेत़ 
 

Web Title: Notice issued against Sarpanch and police Patil against illegal sand mining in village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.