खर्चाचा ताळमेळ न जुळल्याने एका उमेदवाराला नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 12:17 IST2019-04-19T12:16:47+5:302019-04-19T12:17:02+5:30
नंदुरबार : उमेदवारांच्या खर्चाच्या लेख्यांची पहिली तपासणी बुधवारी करण्यात आली. पैकी एका उमेदवाराच्या खर्चाचा ताळमेळ न बसल्याने त्यांना नोटीस ...

खर्चाचा ताळमेळ न जुळल्याने एका उमेदवाराला नोटीस
नंदुरबार : उमेदवारांच्या खर्चाच्या लेख्यांची पहिली तपासणी बुधवारी करण्यात आली. पैकी एका उमेदवाराच्या खर्चाचा ताळमेळ न बसल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागातर्फे देण्यात आली.
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या लेख्याची प्रथम तपासणी बुधवारी खर्च निरीक्षक वागेश तिवारी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात करण्यात आली.
या वेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी बालाजी मंजुळे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वान्मती सी., निवडणूक जिल्हा खर्च संनियंत्रण कक्षाचे समन्वयक अतुल गायकवाड, लेखाधिकारी कांचन धोत्रे, सर्व सहायक खर्च निरीक्षक आदी उपस्थित होते. सदर तपासणीसाठी निवडणूक लढविणाºया ११ उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. एका उमेदवाराच्या लेख्याचा ताळमेळ न जुळल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली. निवडणूक खर्चाच्या लेख्याची दुसरी तपासणी २३ एप्रिल रोजी सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत रंगावली सभागृहात होणार आहे. सबंधितांनी निर्धारीत वेळेत उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बालाजी मंजुळे यांनी सांगितले.