Vidhan Sabha 2019: काकांचा नव्हे तर पक्षाचाच प्रचार करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 12:22 IST2019-09-30T12:22:16+5:302019-09-30T12:22:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापूर विधानसभा मतदारसंघात खासदार डॉ.हिना गावीत यांचे काका भाजप विरोधात निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे ...

Vidhan Sabha 2019: काकांचा नव्हे तर पक्षाचाच प्रचार करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नवापूर विधानसभा मतदारसंघात खासदार डॉ.हिना गावीत यांचे काका भाजप विरोधात निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे खासदार डॉ.गावीत यांची भुमिका काय असेल याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. अखेर दोन दिवसांपूर्वी नवापुरात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी राहण्याचे आवाहन कार्यकत्र्याना केल्यानंतर याविषयीच्या तर्कवितर्काना पुर्णविराम मिळाला आहे.
लोकसभा निवडणुकीत नवापूर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार शरद गावीत यांनी एकहाती तंबू सांभाळत हिना गावीत यांचा प्रचार केला होता. त्यामुळे खासदार डॉ.हिना गावीत त्या उपकाराची परतफेड करतील काय? त्यांची भुमिका काय राहिल. गेल्या आठवडय़ात काका, पुतणी एकाच व्यासपीठावर आले होते. त्यामुळे तर्कवितर्काना उधान आले होते.
अखेर दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात भाजपतर्फे इच्छूक उमेदवार भरत गावीत व खासदार डॉ.हिना गावीत एकाच व्यासपीठावर आले. त्यांनी कार्यकत्र्याना पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या पाठीशी उभे राहून निवडून आणण्याचे आवाहन केले. त्यामुळे खासदार डॉ.गावीत यांची भुमिका स्पष्ट झाल्याने कार्यकत्र्यामधील संभ्रमही दूर झाला आहे.
अर्थात उमेदवारी अर्ज माघारीनंतर राजकीय खेळी कशा खेळल्या जातात त्यावरही बरेच काही अवलंबून राहणार आहे.