शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा पालिकेत विषय समित्यांची निवडणूक बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 13:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तळोदा पालिकेच्या विविध विषय समित्यांची निवडणूक मंगळवारी पालिका सभागृहात घेण्यात आली. याप्रसंगी सर्व समित्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तळोदा पालिकेच्या विविध विषय समित्यांची निवडणूक मंगळवारी पालिका सभागृहात घेण्यात आली. याप्रसंगी सर्व समित्या बिनविरोध घोषित करण्यात आल्या.पालिकेच्या विषय समितीत्यांचा कालावधी एक वर्षांचा असतो. त्यामुळे मावळत्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे नवीन विषय समित्यांची निवडणूक पालिकेच्या सभागृहात घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार पंकज लोखंडे होते. या वेळी मुख्याधिकारी सपना वसावे, कार्यालयीन अधीक्षक विजय सोनवणे, अश्विन परदेशी उपस्थित होते. सर्वच समित्यांच्या सदस्यांसाठी केवळ एक-एकच अर्ज दाखल झाल्यामुळे बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.या वेळी बांधकाम समिती सभापती रामानंद शिरीषकुमार ठाकरे, सदस्य शोभाबाई जालंदर भोई, हेमलाल मगरे, अनिता संदीप परदेशी, हितेंद्र क्षत्रिय, स्वच्छता व आरोग्य समिती सभापती योगेश प्रल्हाद पाडवी, सदस्य सुरेश महादू पाडवी, सविता नितीनपाडवी, संजय बबनराव माळी, सुभाष धोंडू चौधरी, पाणीपुरवठा समिती सभापती अमनोद्दीन फकरोद्दीन शेख, सदस्य भास्कर दत्तू मराठे, सयना अनुपकुमार उदासी, सुभाष धोंडू चौधरी, गौरव देवेंद्रलाल चौधरी, महिला व बालकल्याण समिती सभापती अंबिका राहूल शेंडे, सदस्य बेबीबाई हिरालाल पाडवी, सयना अनुपकुमार उदासी, अनिता संदीप परदेशी, कल्पना सतीवान पाडवी, नियोजन व विकास समिती सभापती भाग्यश्री योगेश चौधरी, हेमलाल पुरूषोत्तम मगरे, भास्कर मराठे, संजय माळी, गौरव वाणी, स्थायी समिती अध्यक्ष अजय परदेशी, सदस्य भाग्यश्री चौधरी, अंबिका राहुल शेंडे, रामानंद ठाकरे, अमानुद्दीन शेख, योगेश पाडवी आहेत. या विषय समित्यांच्या बिनविरोध निवडीसाठी नगराध्यक्ष अजय परदेशी, योगेश चौधरी, अनुपकुमार उदासी, जालंधर भोईल, राहूल शेंडे, राजू पाडवी, नितीन पाडवी, हिरालाल पाडवी, हेमलाल मगरे, भास्कर मराठे यांनी परिश्रम घेतले. या वेळी कार्यकर्त्यांनी स्मारक चौकात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला होता. सभापती निवडी दरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तळोदा पालिकेत आता पावेतो विविध विषय समित्यांच्या सभापती व सदस्यांची निवड बिनविरोध पार पाडली जात होती. या वेळीही सत्ताधारी पक्षांनी निवड बिनविरोध घडवून आणली आहे. १८ सदस्यीय पालिकेत सत्ताधारी भाजपाचे ११, विरोधी काँग्रेसचे सहा, शिवसेना एक असे बलाबल आहे. समित्यांमध्ये सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनादेखील समाविष्ट करुन समतोल साधला आहे.