एमपीएससी परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:31 IST2021-09-03T04:31:42+5:302021-09-03T04:31:42+5:30

शहरातील श्रीमती एच.जी. श्रॉफ हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, मोठा मारुती मंदिराजवळ, नंदुरबार, जी.टी. पाटील महाविद्यालय आयटीआयजवळ, शनिमंदिर रोड, नंदुरबार, ...

No entry to MPSC examination center premises | एमपीएससी परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी

एमपीएससी परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी

शहरातील श्रीमती एच.जी. श्रॉफ हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, मोठा मारुती मंदिराजवळ, नंदुरबार, जी.टी. पाटील महाविद्यालय आयटीआयजवळ, शनिमंदिर रोड, नंदुरबार, दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल, मुख्य डाक कार्यालयाजवळ, अंधारे स्टॉप, नंदुरबार, कमला नेहरू कन्या विद्यालय, स्टेशन रोड, नंदुरबार, एकलव्य विद्यालय व ज.ग. नटावदकर महाविद्यालय, नंदुरबार, एस.ए. मिशन मराठी माध्यमिक शाळा, तळोदा रोड, नंदुरबार, एस. ए. मिशन इंग्रजी माध्यमिक शाळा, तळोदा रोड, नंदुरबार, पी. के. पाटील महाविद्यालय, नवापूर-साक्री रोड नंदुरबार, डॉ.काणे गर्ल्स हायस्कूल, मुख्य डाक कार्यालयाजवळ, नंदुरबार अशा नऊ उपकेंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे.

परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिसरात ४ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेपासून ते दुपारी १ वाजेपर्यंत परीक्षेसाठी संबंधित नसलेल्या कोणत्याही व्यक्तीस प्रवेशास बंदी असेल. हे आदेश परीक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलीस, होमगार्ड यांच्यासाठी लागू होणार नाही. तसेच परीक्षा केंद्राच्या जवळच्या २०० मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी, आयएसडी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स दुकाने, कॉम्प्युटर दुकाने व ध्वनिक्षेपक वापरासाठी या कालावधी मनाई असेल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: No entry to MPSC examination center premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.