बोगस डॅाक्टरसंदर्भात दोन वर्षांत एकही कारवाई नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:38 IST2021-02-25T04:38:57+5:302021-02-25T04:38:57+5:30
नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत एकाही बोगस डॅाक्टरावर कारवाई करण्यात आलेली नाही. वास्तविक सातपुड्याच्या दुर्गम भागात अनेक ठिकाणी ...

बोगस डॅाक्टरसंदर्भात दोन वर्षांत एकही कारवाई नाही
नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत एकाही बोगस डॅाक्टरावर कारवाई करण्यात आलेली नाही. वास्तविक सातपुड्याच्या दुर्गम भागात अनेक ठिकाणी असे डॅाक्टर कार्यरत असताना कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात आरोग्य सेवा पोहोचल्याचा दावा प्रशासन करीत असले, तरी शासकीय आरोग्य केंद्र, उपकेंद्रात डॅाक्टर व कर्मचारीच राहत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे बोगस डिग्री घेऊन डॅाक्टरकी करणाऱ्यांचे अशा भागात फावत असते. गेल्या २०१५ पर्यंत बोगस डॅाक्टरांवरील कारवाई केली जात होती. परंतु गेल्या काही वर्षांत ती थंडावली आहे. गेल्या दोन वर्षांत आरोग्य विभागाने एकाही बोगस डॅाक्टरवर कारवाई केल्याची नोंद नाही. त्यामुळे बोगस डॅाक्टरांबाबत आरोग्य विभाग उदासीन असल्याचे चित्र नंदुरबार जिल्ह्यात आहे.