शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

१०० वर्षात प्रथमच कोरडी पडली तळोदा तालुक्यात वाहणारी निझरा नदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 12:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : तळोदा तालुक्यात वाहणारी सर्वाधिक वेगवान अशा निझरा नदीला साडेचारशे वर्षात प्रथमच पाणी आलेले नाही़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : तळोदा तालुक्यात वाहणारी सर्वाधिक वेगवान अशा निझरा नदीला साडेचारशे वर्षात प्रथमच पाणी आलेले नाही़ नदीवर बांधलेल्या धनपूर धरण प्रकल्पात पाणीसाठा झाल्याने नदीचे पात्र प्रथमच कोरडे पडले आहे़तळोदा तालुक्यातील दुर्गम भागात झऱ्यातून प्रवाहित होणारी निझरा नदी छोटा धनपूर ते मोड यादरम्यान विस्तीर्ण होते़ रूंदावलेल्या पात्रात पावसाळ्याचे चार महिने नदीचे पाणी पूर्वी खळाळून वाहत असे़ दरम्यान गेल्या दोन वर्षांपूर्वी नदीवर धनपूर गावाजवळ मध्यम प्रकल्पाची उभारणी जलसंपदा विभागाकडून करण्यात आली़ गेल्या वर्षी झालेल्या विक्रमी पावसामुळे धरण जुलै महिन्यात भरून आॅगस्ट महिन्यात नदीला पूर आला होता़ यंदा मात्र पावसाने सुरूवातीच्या काळात दमदार हजेरी न दिल्याने धरणातील साठ्यात वाढ झाली नव्हती़ सध्या तालुक्यात संततधार पाऊस सुरू असला तरी धरण अद्याप भरलेले नाही़ यातून नदी पात्रात पाणी आलेले नसल्याने नदी कोरडी ठाक पडली आहे़ साडेचारशे वर्षात प्रथमच असा प्रसंग आल्याची माहिती मोड ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे़ दरम्यान धनपूर धरणाची क्षमता ३़१८ दशलक्ष घनमीटर आहे़ तूर्तास धरणात केवळ २़२२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे़ या साठ्यात वाढ होत असल्याची माहिती देण्यात आली आहे़ हे धरण भरल्यानंतर नदीपात्रात पाणी सोडले जाणार आहे़ निझरा नदी हे मोड व परिसरातील गावांचा प्रमुख जलस्त्रोत आहे़ नदीच्या पात्रात जमा होणाºया पाण्यामुळे काठावरच्या विहिरी आणि इतर स्त्रोतांमध्ये भूजल पातळीत वाढ होते़ परंतु नदी कोरडी असल्याने चिंता व्यक्त होत आहे़धनपूर धरणातून शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी पाटचाºयांची निर्मिती करण्यात आलेली नाही़ यातून सिंंचनाचा प्रश्न अपूर्ण आहे़ नंदुरबार मध्यम प्रकल्पाचे कनिष्ठ अभियंता शिंदे यांनी धरण लवकरात लवकर भरणार असल्याचे म्हटले असून त्यानंतर नदीपात्रात पाणी येणार असल्याचे म्हटले आहे़