‘निझरा’ने केले ग्रामस्थांचे तोंड गोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 13:12 IST2020-08-24T13:11:55+5:302020-08-24T13:12:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : तळोदा तालुक्यातील बहुचर्चीत धनपूर प्रकल्प अखेर पूर्ण क्षमतेने भरला आहे. या प्रकल्पाच्या सांडव्यातून पाणी ...

‘Nizra’ made the mouths of the villagers sweet | ‘निझरा’ने केले ग्रामस्थांचे तोंड गोड

‘निझरा’ने केले ग्रामस्थांचे तोंड गोड

लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद : तळोदा तालुक्यातील बहुचर्चीत धनपूर प्रकल्प अखेर पूर्ण क्षमतेने भरला आहे. या प्रकल्पाच्या सांडव्यातून पाणी वाहण्यास सुरूवात झाल्याने निझरा नदीला पाणी आले आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. मोड येथे साखर वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला.
भाद्रपद महिन्यातील संततधारेमुळे निझरा नदीला पाणी आल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. गेल्या तीन ते चार दिवसापासून धरण परिसरात पाऊस चांगल्या प्रमाणात होत असून, धनपूर धरण भरून ओसंडून वाहू लागले आहे. संततधार अशीच कायम राहिल्यास परिसरातील शेतशिवारातील विहिरी व कुपनलिकांच्या पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. या पाण्यामुळे पीक जोमात येण्यास मदत होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, श्रावण महिना संपूण भाद्रपद महिन्याच्या सुरूवातीलाच धनपूर धरण पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागल्याने निझरा नदीत पाणी प्रवाहीत होवू लागल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी साखर वाटप करून आनंद व्यक्त केला. या वेळी १५ ते २१ दिवस तरी प्रवाह असाच कायम राहिला पाहिजे, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या धनपूर गावापासून काही अंतरावर असलेल्या निझरा नदीवर धनपूर धरण बांधण्यात आले आहे. या धरणाचे काम गेल्या चार वर्षापूर्र्वीच पूर्ण झाले असून, पहिल्याच वर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. परंतु यंदाच्या श्रावणात पाहिजे तसा पाऊस न झाल्याने नदीत पाणी आले नाही. त्यामुळे धरणही भरले नाही. परिणामी परिसरातील कुपनलिका व विहिरींच्या पाणीसाठा सातत्याने खालावत जात असल्याने शेतकºयांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती. परंतु भाद्रपदाच्या सुरूवातीलाच नदी परिसरात जोरदार पाऊस झाल्याने हे धरण पूर्णक्षमतेने भरून पाणी नदीत प्रवाहीत झाल्यामुळे शेतकºयांतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

Web Title: ‘Nizra’ made the mouths of the villagers sweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.