प्रकाशा विलगीकरण कक्षातून १९ रुग्ण बरे होऊन परतले घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:39 IST2021-04-30T04:39:06+5:302021-04-30T04:39:06+5:30
प्रकाशा येथे विलगीकरण कक्ष तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भारुड यांनी दिल्या होत्या. कोरोनाची सामान्य लक्षणे असलेल्या रुग्णांना ...

प्रकाशा विलगीकरण कक्षातून १९ रुग्ण बरे होऊन परतले घरी
प्रकाशा येथे विलगीकरण कक्ष तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भारुड यांनी दिल्या होत्या. कोरोनाची सामान्य लक्षणे असलेल्या रुग्णांना याठिकाणी ठेवले जात होते. एकूण १९ जणांवर याठिकाणी उपचार करून बरे करुन घरी पाठवण्यात आले. त्यांना एक वेळेचा चहा, एक वेळचा नास्ता व दोन वेळचे जेवण प्रकाशा ग्रामपंचायत व सद्गुरु धर्मशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात आला होता. प्रकाशा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सकाळी दहा व सायंकाळी सहा याप्रसंगी भेटी देऊन उपचार करत होते. विलगीकरण कक्ष तयार होऊन वीस-बावीस दिवस झाले आहेत. या दरम्यान केवळ एकाच रुग्णाला ऑक्सिजन कमी होत असल्याने गुजरातकडे रेफर करण्यात आले होते. आता फक्त चारच जण या विलगीकरण कक्षामध्ये आहेत. विलगीकरण कक्षासाठी मंडळाधिकारी मुकेश चव्हाण, तलाठी धर्मराज चौधरी, ग्राम विकास अधिकारी बी.जी.पाटील, सरपंच सुदाम ठाकरे यांच्यासह शिक्षणाधिकारी माध्यमिक, गटशिक्षणाधिकारी शहादा, केंद्रप्रमुख, यांनी वेळोवेळी भेटी देत पाहणी केली होती.