नऊ हजार शेतकरी ठरणार पिकविमा भरपाईला पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 08:41 PM2019-11-09T20:41:05+5:302019-11-09T20:41:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत यंदा जिल्ह्यातील  9 हजार शेतक:यांनी विमा करुन घेतला होता़ यातून ...

Nine thousand farmers will be eligible to receive crop insurance | नऊ हजार शेतकरी ठरणार पिकविमा भरपाईला पात्र

नऊ हजार शेतकरी ठरणार पिकविमा भरपाईला पात्र

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत यंदा जिल्ह्यातील  9 हजार शेतक:यांनी विमा करुन घेतला होता़ यातून या शेतक:यांचे  10 हजार हेक्टर खरीप पिकपेरणी क्षेत्र संरक्षित झाले होत़े अतीवृष्टी आणि अवकाळी पाऊस यामुळे हे 10 हजार हेक्टर क्षेत्र आपसूकच विमा भरपाईसाठी पात्र ठरत असून आता ही रक्कम शेतक:यांना मिळणार केव्हा, याकडे लक्ष लागून राहणार आह़े     
जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या हजेरीने साडेचार हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आह़े तत्पूर्वी 12 हजार हेक्टर क्षेत्र अतीवृष्टीने बाधित झाले होत़े यात दोन्ही क्षेत्रात विमाधारक शेतक:यांच्या शेतीचा समावेश आह़े शासनाने 22 मे 2019 काढलेल्या अध्यादेशानुसार जिल्ह्यात ‘अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड’ या कंपनीला पिक विमा करण्याची जबाबदारी देण्यात आली आह़े या कंपनीकडून यापुढील कारवाई म्हणून कृषी विभागाच्या सहाकार्याने जिल्हास्तरावर 24, तालुका 16, महसूल मंडळ 10 तर गावस्तरावर पीकनिहाय कापणी प्रयोग निर्धारित करण्यात आले आह़े कापणी प्रयोगात उत्पादकता तपासून पुढील कारवाई करण्यात येणार आह़े यातून शेतकरी अवकाळीच्या हजेरीनंतर विमा कंपनीच्या प्रतिनिधींसह कंपनीने दिलेल्या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क करुन माहिती देण्याचा प्रयत्न करत आहेत़ परंतू त्यांच्याकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नसल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने पीक कापणी प्रयोगांची कारवाई लवकरात लवकर सुरु करावी यासाठी शेतकरी निवेदनांद्वारे पाठपुरावा करत आहेत़ कारवाई लवकर सुरु झाल्यास शेतक:यांच्या नुकसानीची स्थिती अधिक प्रखरपणे पुढे येऊन उत्पादकतेचा अहवालही समोर येणार आह़े जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात दुष्काळी स्थिती असतानाही विमा मिळत नसल्याने यंदा अनेकांनी विमा करण्यावर भर दिलेला नसल्याने संख्या बरीच कमी असल्याचे सांगण्यात आले होत़े 


2019-20 या वर्षात पीक विमा योजनेंतर्गत 30 जुलैर्पयत जिल्ह्यातील 2 हजार 694 कजर्दार तर 3 हजार 784 बिगर कजर्दार शेतक:यांनी पीकविमा करुन घेतला होता़  एकूण 6 हजार 482 शेतक:यांनी 1 कोटी 19 लाख 80 हजार 328 रुपयांचा भरणा केल्याने त्यांच्या 7 हजार 46़46 हेक्टर क्षेत्र संरक्षित क्षेत्राला संरक्षण प्राप्त झाले होत़े शासनाने विम्या योजनेत पुन्हा दोन दिवस मुदत वाढ दिल्याने 2 ऑगस्ट र्पयत 3 हजार 313 शेतकरी नव्याने जोडले गेले होत़े मुदतवाढीनंतर जिल्ह्यातून 4 हजार 411 कजर्दार तर 5 हजार 385 बिगर कजर्दार शेतक:री पिक विमाधारक झाले होत़े एकूण 9 हजार 796 शेतक:यांनी 1 कोटी 67 लाख 38 हजार 520 रुपयांची रक्कम विम्यापोटी जमा केली होती़  यातून 10 हजार 306 हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले होत़े शासनाने 8 कोटी 12 लाख 53 हजार रुपये अनुदान देत विमा कंपनीकडे 36 कोटी 82 लाख रुपयांचा भरणा केला आह़े भरणा पूर्ण झाल्याने शेतक:यांना पुढील काळात नैसर्गिक आपत्तीच्या निकषानुसार 100 टक्के नुकसानभरपाई मिळणार आह़े शासनाने काढलेल्या अध्यादेशात अवकाळी आणि अतीवृष्टीचा उल्लेख असल्याने जिल्ह्यातील शेतक:यांना यंदा आर्थिक नुकसानीतून विमा तारणार हे स्पष्ट होत आह़े 


जिल्ह्यातील भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, कापूस, भूईमूग, सोयाबीन, तीळ, कापूस आणि खरीप कांदा या पिकांना भरपाई देण्याचे शासनाकडून सूचित करण्यात आले आह़े यासाठी कापणी प्रयोग संबधित कंपनी कधी, सुरु करणार याकडे शेतक:यांचे लक्ष लागून आह़े विशेष म्हणजे वरील सर्व पिकांवर पूर, क्षेत्र जलमय होणे, पूर, कीडरोग आणि अतीवृष्टी अशी संकटे आली होती़ यातून ही पिके खराब झाल्याने उत्पादन पूर्णपणे घटल्याने शेतक:याला भरपाई देण्यास शासनाने नियुक्त केलेली कंपनी बाध्य ठरणार आह़े नुकसानीच्या पाश्र्वभूमीवर शासकीय अध्यादेशानुसार कामकाज न झाल्यास शेतकरी आतापासून आंदोलनाच्या पवित्र्यात असून येत्या काळात तशी वेळ येणार नसल्याची अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आह़े 
 

Web Title: Nine thousand farmers will be eligible to receive crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.