जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत निकीता माळी प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 12:28 IST2019-08-29T12:28:22+5:302019-08-29T12:28:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबारतर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत येथील वसंतराव नाईक कनिष्ठ ...

Nikita Mali was the first in the district level lecture competition | जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत निकीता माळी प्रथम

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत निकीता माळी प्रथम

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबारतर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत येथील वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयातील निकिता माळी हिने प्रथम क्रमांक पटकविला.
युवा सांसद सन 2019-20 अंतर्गत नंदुरबार येथे ‘महाराष्ट्रावर बोलू काही’ या विषयावर जिल्हास्तरीय वक्तृतत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शहादा येथील वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी निकिता मोहनलाल माळी हिने प्रथम क्रमांक पटकावला. मुंबई येथे होणा:या राज्यस्तरीय स्पर्धेतसाठी तिची निवड झाली आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, शिक्षणाधिकारी एम.व्ही. कदम यांच्या हस्ते तिला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. निकिता माळी हिच्या या यशाबद्दल संस्थेचे विभागीय सचिव प्रा.संजय जाधव, वर्षा जाधव, प्राचार्य संजय राजपूत, उपप्राचार्य आर.जे. रघुवंशी, उपमुख्याध्यापक एन.बी. कोते, पर्यवेक्षक सुनील सोमवंशी व शिक्षकांनी तिचे कौतुक केले.

Web Title: Nikita Mali was the first in the district level lecture competition