लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लॉकडाऊनमध्ये राज्य बंदीचा आदेशाचे उल्लंघन करीत पळून जात कोठली, ता.निझर येथे विवाह करणाऱ्या नवदाम्पत्याला न्यायायाने दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला.नंदुरबारातील तुषार सुरेश वाघ व श्वेता यांनी १५ मे रोजी सकाळी नऊ वाजता दुचाकीने कोठली, ता.निझर (गुजरात) येथे पळून जावून लग्न केले. याबाबत १८ मे रोजी नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. लॉकडाऊनच्या काळात राज्य व जिल्हा बाहेर प्रवासाला बंदी असतांना त्याचे उल्लंघन करीत व पोलीस ठाण्यात तोंडाला मास्क न लावता आले होते. त्यामुळे प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्याने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.ए.विराणी यांनी दोघांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला, दंड न भरल्यास पाच दिवसांची साधी कैदचीही शिक्षा सुनावली आहे.
जिल्हा बंदीचे उल्लंघन नवदाम्पत्याला दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 11:53 IST