नव्याने मतदार नोंदणी मोहिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 12:48 IST2019-11-18T12:47:59+5:302019-11-18T12:48:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भारत निवडणूक आयोगाच्या निदेर्शानुसार 1 जानेवारी 2020 या दिनांकास वयाची 18 वर्षे पुर्ण करणा:या ...

नव्याने मतदार नोंदणी मोहिम
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : भारत निवडणूक आयोगाच्या निदेर्शानुसार 1 जानेवारी 2020 या दिनांकास वयाची 18 वर्षे पुर्ण करणा:या युवकांसाठी विशेष संक्षिप्त पुर्नरीक्षण कार्यक्रामंतर्गत मतदार नोंदणी मोहिम घेण्यात येत आहे. वंचित मतदारदेखील आपली नाव नोंदणी या कार्यक्रमांतर्गत करू शकतात.
या कार्यक्रमापूर्वी मतदार पडताळणी कार्यक्रम 20 डिसेंबर पयर्ंत राबविण्यात येणार आहे. मतदारांना एनव्हीएसपी पोर्टल, वोटर हेल्पलाईन मोबाईल अॅप, कॉमन सव्र्हिस सेंटर किंवा केंद्रस्तीय अधिका:यांकडे मतदार यादीतील तपशीलाची तपासणी करावी. आवश्यकता असल्यास फॉर्म क्र.आठ भरून सुधारणा करता येणार आहे. तसेच कुटुंबातील मयत व कायमस्वरुपी स्थलांतरीत मतदारांची नावे फॉर्म क्र. सात भरून वगळता येणार आहे. मतदार यादी पडताळणी कार्यक्रम 11 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर, प्रारुप मतदार यादी प्रसिद्धी 30 डिसेंबर 2019, दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी 30 जानेवारी 2020, विशेष मोहिमेचा कालावधी 4 व 5 जानेवारी तसेच 11 व 12 जानेवारी (शनिवार व रविवार), दावे व हरकती निकाली काढणे 10 फेब्रुवारी पूर्वी, प्रारुप मतदार यादीच्या मापदंडाची तपासणी व अंतिम यादी प्रसिद्ध करण्यासाठी आयोगाची 20 रोजी परवाणगी घेतली जाणार आहे. जिल्ह्यातील सध्याचे मतदार असलेल्या मतदारांनी आपल्या मोबाईलद्वारे मतदार यादीची नोंद व फोटोची तपासणी करण्यासाठी विविध कागदपत्रे लोड करावी. त्यात पासपोर्ट, वाहतूक परवाना, आधार, रेशनकार्ड, शासकीय किंवा अर्धशासकीय कार्यालयाचे ओळखपत्र, बँकेचे पासबूक, शेतकरी ओळखपत्र, पॅन कार्ड, स्मार्ट कार्ड किंवा अलिकडच्या काळातील पाणी, दूरध्वनी, विद्युत किंवा गॅसचे देयक अपलोड करावे. असे आवाहन जिल्हाधिका:यांनी केले आहे.