नवीन वस्त्रोद्योग धोरणाचा सूतगिरणीला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 12:28 IST2019-09-30T12:28:33+5:302019-09-30T12:28:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : नवीन वस्त्रोद्योग धोरण सरकारने जाहीर केल्याने जुन्या सुतगिरण्यांना सूत विक्रीतून कमी नफा मिळतो. परिणामी ...

नवीन वस्त्रोद्योग धोरणाचा सूतगिरणीला फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : नवीन वस्त्रोद्योग धोरण सरकारने जाहीर केल्याने जुन्या सुतगिरण्यांना सूत विक्रीतून कमी नफा मिळतो. परिणामी सूतगिरणीला आर्थिक फटका बसतो. सरकारी धोरण तसेच प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत ‘शेतकरी विकास हाच ध्यास’ डोळ्यासमोर ठेवून सहकारातून समृद्धीसाठी आपण जबाबदारी पार पाडत राहू, असे प्रतिपादन सूतगिरणीचे चेअरमन दीपक पाटील यांनी केले.
लोकनायक जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सूतगिरणी कमलनगर, उंटावद-होळ, ता.शहादाच्या 39 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दीपक पाटील बोलत होते. पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाच्या महात्मा गांधी सभागृहात रविवारी झालेल्या सभेस प्रमुख अतिथी म्हणून सातपुडा कारखान्याच्या माजी अध्यक्षा कमलताई पाटील, पं.स.चे माजी सभापती माधव जंगू पाटील, दरबारसिंग पवार, वांगीबाई पावरा, बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, उपसभापती रवींद्र रावल, माजी नगराध्यक्ष विजय दामू पाटील, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन राजाराम पाटील, सातपुडा कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रेमसिंग आहेर, सूतगिरणीचे व्हा.चेअरमन रोहिदास पाटील, गिरधर पाटील, उद्धव रामदास पाटील, जे.पी. पाटील, रमाकांत पाटील, ईश्वर मंगेश पाटील, आनंदराव पाटील यांच्यासह सूतगिरणीचे संचालक उपस्थित होते.
प्रारंभी देश-विदेशातील गत काळात मृत्यू पावलेल्या विविध क्षेत्रातील नामवंतांसह सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दीपक पाटील म्हणाले की, सहकारी प्रकल्पांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासकीय धोरण, नोटबंदीसह अती पावसामुळे शेतकरी बांधवापुढे संकट उभे राहिले आहे. ऊस व कापूस उत्पादक सभासद व शेतक:यांनी संकटांना घाबरून जाऊ नये. संयमाने व विचारपूर्वक निर्णय घ्यावा. कापूस उत्पादनावर अती पावसामुळे परिणाम होणार असला तरी उत्पादीत मालास आपली सूतगिरणी गत वर्षाच्या तुलनेत योग्य भाव देईल. कष्टकरी जनतेच्या मेहनतीचे चीज झाल्यास त्यांना आनंद होणे स्वाभाविक आहे. शेतक:यांचे प्रश्न, समस्या, समजून घेऊन मार्ग काढणे ही स्व.पी.के. अण्णांची शिकवण आहे. संकटांना घाबरून गेल्यास यश मिळत नाही. समस्या सुटावी यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. ‘सहकार भारती’ या सहकार क्षेत्रासाठी कार्यरत राज्यस्तरीय संस्थेकडून आपल्या सहकारी प्रकल्पांना मौलिक सहकार्य लाभत आहे. सहकारातून शेतकरी भक्कमपणे उभा राहावा यासाठी आपण कार्यरत असून, दुस:यांच्या चांगल्या कामाचे आपण कौतुक केले तर निश्चितच आपल्याही कार्याची दखल घेतली जाते. लोकनायक सूतगिरणीतर्फे आगामी काळात शेतक:यांना चांगला भाव दिला जाईल. कोणाचेही घेणे सूतगिरणीवर शिल्लक राहू दिले जाणार नाही. सूतगिरणीतर्फे शेतकरी, सभासद, कामगार, कर्मचारी आदी संबंधीत सर्वच घटकांचे हित जपणूक केली जाईल, असेही स्पष्ट केले.
या वेळी कृषीतज्ज्ञ रामेश्वर चांडक यांनी अनावश्यक खर्च टाळून कापूस-ऊस उत्पादन वाढीसाठीच्या उपायांबाबत माहिती दिली. पाटील यांच्यावर झालेली शस्त्रक्रिया तसेच अपघाताच्या घटनेतून सुखरूप बचावल्याने ज्येष्ठ सभासद रतिलाल पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. लेखा परीक्षक श्रीराम देशपांडे यांची राष्ट्रीय पातळीवरील संस्थेत संचालकपदी नियुक्ती झाल्याने सत्कार करण्यात आला.
गतवर्षीच्या वार्षिक सभेचा वृत्तांत कार्यकारी संचालक आर.डी. पाटील यांनी वाचून दाखविला. यानंतर सन 2019-20 च्या अंदाजपत्रक ताळेबंदासह विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना एकमुखी मंजुरी देण्यात आली. सूत्रसंचालन सूतगिरणीचे ज्येष्ठ संचालक के.डी. पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी सूतगिरणीच्या कर्मचा:यांनी परिश्रम घेतले.