नवापूरात सख्ख्या भावांनी जाळला फर्निचरचा कारखाना
By Admin | Updated: April 11, 2017 13:09 IST2017-04-11T13:09:40+5:302017-04-11T13:09:40+5:30
भावाच्या फर्निचर कारखान्याला आग लावून चार लाख रूपयांचे नुकसान केल्याप्रकरणी नवापूर येथील सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आह़े

नवापूरात सख्ख्या भावांनी जाळला फर्निचरचा कारखाना
नंदुरबार, 11- भावाच्या फर्निचर कारखान्याला आग लावून चार लाख रूपयांचे नुकसान केल्याप्रकरणी नवापूर येथील सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आह़े याप्रकरणी कारखानामालकाने सोमवारी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आह़े
नवापूर येथील अब्बास दाऊद शेख (कुरेशी) यांच्या नवापूर शिवारातील गट क्रमांक 94/01 या शेतात लाकडी फर्निचर तयार करण्याचा व्यवसाय आह़े याठिकाणी 20 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली होती़ दिवसभर सुरू असलेल्या या आगीत चार लाख रूपयांचे फर्निचर आणि इतर साहित्य जळून खाक झाले होत़े या घटनेनंतर सोमवारी अब्बास दाऊद शेख यांनी नवापूर पोलीस गाठून एजाज दाऊद खाटीक, मुसा दाऊद खाटीक, सलाम दाऊद खाटीक, युसूफ दाऊद खाटीक, अमिद दाऊद खाटीक व अमजद दाऊद खाटीक सर्व रा़ मेमन गल्ली नवापूर, यांनी लावल्याचे सांगत गुन्हा दाखल केला.
या घटनेतील फिर्यादी अब्बास दाऊद शेख व संशयित सर्व सहा आरोपी हे सख्ख्ये भाऊ आहेत. नवापूर पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास हा गुन्हा दाखल झाला आहे.