शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan out of T20 World Cup : पाऊस आला धावून, पाकिस्तान गेला वाहून! अमेरिका Super 8 मध्ये, रचला इतिहास
2
'शरद पवार माझे आवडते नेते, माझं काम त्यांनी तीन मिनीटांत केलं होतं'; अशोक सराफ यांनी सांगितला किस्सा
3
अमित शहांनी सुरक्षा अधिकाऱ्यांची घेतली बैठक; जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा घेतला आढावा
4
Maharashtra Assembly Session : राज्याचं पावसाळी अधिवेशन ठरलं! अर्थसंकल्प 'या' दिवशी मांडणार, किती दिवस चालणार?
5
मोठी बातमी! अमोल किर्तीकर यांना सीसीटीव्ही फूटेज देण्यास उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा नकार
6
इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे केले स्वागत, पाहा व्हिडीओ
7
अजय जडेजानं वन डे वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानला मार्गदर्शन करण्यासाठी एकही रुपया घेतला नाही
8
“छगन भुजबळांनी बंड पुकारून आपले बळ दाखवावे, विधानसभेत धडा शिकवावा”: विजय वडेट्टीवार
9
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: वाह ‘गुरु’! मातीचे सोने करण्याची शक्ती असलेला ग्रह; चंद्राशी ‘युती’ म्हणजे ‘राजयोग’च
10
Maharashtra Politics : 'अजितदादांना सगळीकडून घेरलं,पण पक्षातील कोणच बोलत नाही'; जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टच सांगितलं
11
“आमचे सरकार आले तर मराठा आरक्षणाची मागणी प्रथम पूर्ण करणार”; जयंत पाटील यांनी दिली गॅरंटी!
12
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार; राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले- 'युद्धविरामाला आम्ही तयार, पण...'
13
अजित पवारांच्या विरोधातील मोहीम कुणाच्या इशाऱ्यावर? अण्णा हजारेंच्या भूमिकेवर NCPचा पलटवार
14
“शाहगड येथे कार्यालय सुरू करणार, आंदोलन सोडणार नाही”; मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार
15
ICC ने जाहीर केलं टीम इंडियाचं Super 8 चं वेळापत्रक; जाणून घ्या कधी, केव्हा व कोणाला भिडणार
16
सुनेत्रा पवार यांचा फॉर्म भरताना शिंदे-फडणवीस का नव्हते? अजित दादांनी स्पष्टच सांगितले
17
Photos: तुम हुस्न परी... डिझायनर ड्रेस, फॅशनेबल गॉगल; अवनीत कौरचं 'ग्लॅमरस' फोटोशूट
18
या पेनी स्टॉकच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड, किंमत ₹5 पेक्षाही कमी, एकाच महिन्यात दिला 55% परतावा!
19
RSSच्या मुखपत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका; अजित पवारांचे थेट शब्दांत भाष्य, म्हणाले...
20
'सुनिताला परवानगी देण्यात यावी...', केजरीवाल यांची न्यायालयाकडे नवी विनंती; अर्ज करत केल्या दोन मागण्या

कोरोनाबाधीतच्या मृतदेहाची ना आदलाबदल ना हेळसांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2020 12:32 PM

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार सिव्हीलच्या न्यायवैद्यक विभागाने नंदुरबार मेड ‘लीक फ्रूफ बॉडी बॅग’ची केलेली ...

मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार सिव्हीलच्या न्यायवैद्यक विभागाने नंदुरबार मेड ‘लीक फ्रूफ बॉडी बॅग’ची केलेली निर्मिती आणि नव्याने तयार केलेला ‘टेम्पररी होल्डींग एरिया’ या उपाययोजनांमुळे कोरोनाबाधीत मृतदेहांची आदलाबदल झालेली नाही, मृतांच्या नातेवाईकांना देखील मृतदेहाचे मुखदर्शन करता येते. आतापर्यंत कोरोनाचे ८१ व कोरोना संशयीत १३० अशा २११ जणांना याप्रकारे अंत्यसंस्कारासाठी पाठविण्यात आले आहे. यामुळे मृतांच्या नातेईकांनाही दु:खाच्या सावटात समाधानाची झुळूक अनुभवण्यास मिळत आहे.राज्यातील अनेक ठिकाणी कोरोना बाधीत व्यक्तींच्या मृतदेहाची आदलाबदल झाल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नातेवार्इंकाना मन:स्ताप देखील सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी पैसा आणि वेळ देखील यामुळे वाया जात आहे. परंतु नंदुरबार जिल्ह्यात न्यायवैद्यक विभागाने केलेले योग्य नियोजन आणि काही स्थानिक उपाययोजना यामुळे दु:खात असलेल्या नातेवाईकांना समाधान मिळत आहे.कोरोनाबाधीत मृतदेहाला नातेवाईकांच्या ताब्यात दिले जात नाही. त्याची शास्त्रीय पद्धतीने पॅकींग केली जाते. त्यासाठी बहूतेक ठिकाणी बाजारात मिळणाऱ्या बॉडी बॅगचा वापर केला जातो. ती बॅग पुर्णत: बंदीस्त असते. त्यामुळे आतील मृतदेह कुणाचा हे नातेवाइकांना समजत नाही. परंतु नंदुरबारात आधीपासूनच बाजारातील बॅगेचा वापर केला गेला नाही. त्यासाठी स्थानिक ठिकाणीच लीक फ्रूफ बॉडी बॅग तयार केली जात आहे. यासाठी बाजारात उपलब्ध असलेले साहित्य वापरले जात आहे. त्यात चेन, साधी पन्नी आणि खताच्या गोणीसाठी वापरली जाणारी जाड पन्नी, पट्टी, दोरा, प्लॅस्टिकचा जाड पारदर्शी कागद यांचा समावेश असतो. गावातील उपलब्ध असलेल्या टेलर कडून ही बॅग शिऊन घेतली जाते. साधारणत: चार लेअरमध्ये ती बॅग असते. मृतदेहाचा चेहरा दिसावा यासाठी त्या ठिकाणी पारदर्शी प्लॅस्टिक कागद शिवला जातो. यामुळे नातेवाईकांना मुखदर्शन घेता येते. तशी सोय जिल्हा रुग्णालयातच केली जाते. त्यानंतर दोन नातेवाईकांसह जिल्हा रुग्णालय, पालिकेचे कर्मचारी मृतदेहाला अंत्यसंस्कारासाठी नेतात. अंत्यसंस्कारासाठी उपस्थित पाचही जणांना पीपीई किट घालणे अनिवार्य असते.लिक फ्रूफ बॉडी बॅग एकावेळी २० ते २५ संख्येने उपलब्ध राहील याची दक्षता घेतली जाते. ही बॅग बाजारात साधारणत: ८०० ते १२०० रुपयांना मिळते. परंतु स्थानिक ठिकाणी तयार केली जात असल्याने ती केवळ ४५० ते ५५० रुपयात बनवून घेतली जाते.नंदुरबारातील कोरोनाबाधीत व संशयीतांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी जुन्या स्मशानभुमिचा वापर केला जातो. तेथे तीन स्टॅण्ड तयार करण्यात आले आहेत. २४ ते ३६ तासात एका स्टॅण्डमध्ये एकाच मृतदेहाचा अंत्यसंस्कार केला जातो.एकुणच राज्यभरात मृतेदहांची आदलाबदल, मुखदर्शन करू न देण्याची सोय त्यांची हेळसांड, अंत्यसंस्कारासाठीची वेटींग अशा समस्या असतांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील न्यायवैद्यक विभागाने मात्र या सर्व बाबींवर उपाय शोधून घेतले आहेत.टेम्पररी होल्डींग एरिया... उपचार घेतांना कोरोना बाधीत किंवा संशयीताचा मृत्यू झाल्यास व नातेवाईकांना येण्यास किंवा अंत्यस्काराला वेळ लागणार असल्यास टेम्पररी होल्डींग एरिया तयार करण्यात आला आहे. त्यासाठी एक हॉल तयार करून त्यात तीन बेड व एक कोल्डस्टोरेज ठेवण्यात आले आहे. संबधीताचा मृत्यू झाल्यानंतर लागलीच बेडवरून त्यांना या ठिकाणी बॉडीबॅगमध्ये पॅक करून ठेवले जाते. मृतदेहासह त्याच्याजवळील सर्व सामान देखील ठेवला जातो. नातेवाईक आल्यावर सर्व सामान ताब्यात घेतात. मृतदेहाची खात्री पटविली जाते. त्यानंतर एका छापील फॉर्मवर नातेवाईकाची सही करून घेतली जाते. यामुळे वस्तू हरविण्याच्या तक्रारी किंवा मृतदेह आदलाबदल होण्याचा संभव राहत नाही असे न्यायवैद्यक अधिकारी डॉ. आर.ए.थोरात यांनी सांगितले.