राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील आज नंदुरबारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:31 IST2021-02-10T04:31:59+5:302021-02-10T04:31:59+5:30

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नंदुरबार दौऱ्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. मंगळवारी जिल्हाध्यक्ष डाॅ. मोरे यांनी ...

NCP State President Water Resources Minister Jayant Patil in Nandurbar today | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील आज नंदुरबारात

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील आज नंदुरबारात

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नंदुरबार दौऱ्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. मंगळवारी जिल्हाध्यक्ष डाॅ. मोरे यांनी कार्यक्रम स्थळी भेट देत आढावा घेतला. यावेळी ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस कमलेश चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष बी.के पाडवी, जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, शहराध्यक्ष नितीन जगताप, तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते माधवराव चौधरी, जितेंद्र कोकणी आदी उपस्थित होते

जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे बुधवारी सकाळी ११.३० वाजता साक्री येथून नंदुरबारात येणार आहेत. दुपारी १२ वाजेपासून ते जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेणार आहेत. दुपारी दीड वाजेपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थिती देत जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेत मार्गदर्शन करणार आहेत. यानिमित्त सेंट मदर टेरेसा स्कूलच्या प्रांगणात बैठक व्यवस्था तयार करण्यात आली असून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

Web Title: NCP State President Water Resources Minister Jayant Patil in Nandurbar today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.