काँग्रेस विश्वासात घेत नसल्याने राष्ट्रवादी नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 15:54 IST2019-04-08T15:53:38+5:302019-04-08T15:54:29+5:30

वेगळी भुमिका घेणार : नवापूर तालुका मेळावा

NCP resentful because Congress is not taking it into confidence | काँग्रेस विश्वासात घेत नसल्याने राष्ट्रवादी नाराज

काँग्रेस विश्वासात घेत नसल्याने राष्ट्रवादी नाराज

नवापूर : काँग्रेस पक्षाने तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संपर्क केला नाही. बैठकीसाठीही बोलविण्यात येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवापूरात वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत.
नवापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक माजी आमदार शरद गावीत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली. बैठकीत कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षावर नाराजी व्यक्त केली. नंदुरबारचा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आघाडीचा उमेदवार ठरवितांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विश्वासात घेतले गेले नाही. राष्ट्रवादीची कुठलीही दखल घेतली जात नाही. स्थानिक स्वराज्य संस्था व नवापूर पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सदस्यांना विश्वासात घेतले जात नाही. तालुक्यातील राष्ट्रवादीच्या ताब्यातील ५१ ग्रामपंचायतींपैकी १५ ग्रामपंचायतीच्या विरोधात खोट्या तक्रारींवरून चौकशी लावण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
यासंदर्भात राष्टÑवादीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील पत्रक प्रसिद्धीस दिले आहेत.

Web Title: NCP resentful because Congress is not taking it into confidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.