राष्ट्रवादीचे शहादा व नवापुरवरच लक्ष केंद्रीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 12:12 IST2019-07-26T12:11:59+5:302019-07-26T12:12:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीत शहादा व नवापूर या दोन विधानसभा मतदार संघांची मागणी केली ...

NCP focuses on martyrdom and Navapur | राष्ट्रवादीचे शहादा व नवापुरवरच लक्ष केंद्रीत

राष्ट्रवादीचे शहादा व नवापुरवरच लक्ष केंद्रीत

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीत शहादा व नवापूर या दोन विधानसभा मतदार संघांची मागणी केली आहे. त्यानुसार या दोनच जागांसाठी प्रबळ नेत्यांनी उमेदवारीची मागणी पक्षाकडे केलेली असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत यांनी दिली. 
याबाबत माहिती देतांना गावीत यांनी सांगितले, राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आणि इच्छुकांच्या मुलाखती बुधवारी शहादा येथे झाल्या. मेळाव्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उन्मेश पाटील, निरिक्षक नाना महाले यांनी मार्गदर्शन केले. विधानसभा निवडणुका पुर्ण ताकदीने लढविण्यासाठी पक्ष कार्यकत्र्यानी मेहनत घ्यावी असे आवाहन केले. आघाडी झाल्यास शहादा व नवापूर या दोन विधानसभा मतदारसंघांची मागणी आहे. त्या दृष्टीने सकारात्मक प्रतिसादही मिळत असल्याने पदाधिका:यांनी तयारी करावी असे आवाहन उन्मेश पाटील व नाना महाले यांनी मेळाव्यात केले. जिल्ह्यातील चारही मतदारसंघासाठी मोठय़ा प्रमाणावर इच्छूक उमेदवार होते. परंतु पक्षाने शहादा व नवापूर मतदारसंघावरच लक्ष केंद्रीत केल्याने या दोन मतदारसंघासाठीच मुलाखती झाल्या. शहादा मतदारसंघासाठी स्वत: राजेंद्रकुमार गावीत तर नवापूर मतदारसंघासाठी माजी आमदार शरद गावीत यांनी इच्छूक म्हणून तयारी दर्शविली. शिवाय तेच प्रमुख दावेदार असल्याने अन्य पदाधिका:यांनी त्यांच्या नावाला पाठींबा दिला. परिणामी इतर इच्छूकांनी मुलाखती दिल्या नसल्याची माहितीही राजेंद्रकुमार गावीत यांनी दिली.    
 

Web Title: NCP focuses on martyrdom and Navapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.