राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पूरग्रस्तांसाठी दीड लाखांचा निधी गोळा करून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:34 IST2021-08-13T04:34:56+5:302021-08-13T04:34:56+5:30
तळोदा : येथील राष्ट्रवादी काँग्रेसकडून पूरग्रस्तांसाठी गोळा करण्यात आलेला दीड लाखांच्या निधी मुंबईत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पदाधिकाऱ्यांनी सुपूर्द ...

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पूरग्रस्तांसाठी दीड लाखांचा निधी गोळा करून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्द
तळोदा : येथील राष्ट्रवादी काँग्रेसकडून पूरग्रस्तांसाठी गोळा करण्यात आलेला दीड लाखांच्या निधी मुंबईत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पदाधिकाऱ्यांनी सुपूर्द केला आहे. गेल्या महिन्यात झालेल्या अतिपर्जन्य वृष्टीमुळे कोकणासह सांगली, सातारा, कोल्हापूर येथे प्रचंड नुकसान झाले होते. या पूरग्रस्तांसाठी तळोदा राष्ट्रवादी काँग्रेसपार्टीकडून तळोदा शहरात मदत फेरी काढण्यात आली होती. या मदत फेरीत जमा झालेला व पदाधिकारी यांनी स्वतः रक्कम टाकून साधारण एक लाख ५१ हजारांचा निधी माजी आमदार व प्रदेश उपाध्यक्ष उदेसिंग पाडवी यांचा उपस्थितीत मुंबई येथे पक्षाचे प्रदेश अध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वेल्फेअर ट्रस्टकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस कमलेश चौधरी, जिल्हा संघटक एन. डी. पाटील, डॉ. तुषार सनासे, नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, बाजार समितीचे संचालक भरत चौधरी, संदीप परदेशी, योगेश मराठे उपस्थित होते.