एनसीसीचे कमांडिंग अधिकारी शर्मा यांची नंदुरबारातील शाळांना भेटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 13:24 IST2020-02-11T13:24:21+5:302020-02-11T13:24:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महाराष्ट्र बटालियन राष्ट्रीय छात्रसेनेचे कमांडिंग अधिकारी लेप्ट.कर्नल अरविंद मिश्रा हे नंदुरबार दौऱ्यावर आले आहे. ...

एनसीसीचे कमांडिंग अधिकारी शर्मा यांची नंदुरबारातील शाळांना भेटी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : महाराष्ट्र बटालियन राष्ट्रीय छात्रसेनेचे कमांडिंग अधिकारी लेप्ट.कर्नल अरविंद मिश्रा हे नंदुरबार दौऱ्यावर आले आहे. त्यांनी शहरातील जी.टी.पाटील महाविद्यालय, डी.आर. हायस्कुल व एकलव्य विद्यालयांना भेटी देत विविध तेथील छात्रसैनिकांशी संवाद साधला.
आपल्या भेटीत लेप्ट.मिश्रा यांनी एन.सी.सी. कार्यालय व ग्रंथालयाचीही पाहणी केली जी.टी.पाटील महाविद्यालय व संस्थेच्या वतीने प्राचार्य डॉ.व्ही.एस. श्रीवास्तव, डी.आर. हायस्कुल येथे मुख्याध्यापक पी.डी. पिंपळे व एकलव्य विद्यालयात मुख्याद्यापिका सुहासिनी नटावदकर यांनी लेफ्ट कर्नल मिश्रा यांचा सत्कार केला.
जी.टी.पाटील महाविद्यालयात समन्वयक डॉ.एम.एस. रघुवंशी, उपप्राचार्य डॉ.आर.आर. कासार, डॉ.महेंद्र रघुवंशी यांनी सुबेदार बलवानसिंग हवलदार यांचे स्वागत केले. तसेच विलास वाघ, राहुल पाटील व लेप्ट.डॉ.विजय चौधरी यांनी एन.सी.सी. शाळा व महाविद्यालयीन स्तरावर विकसीत करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा केली.
आपल्या भेटीत छात्रसैनिकांना मार्गदर्शन करतांना त्यांनी एन.सी.सी. आत्मविश्वास वाढविणारी यंत्रणा आहे. असे प्रतिपादन करत छात्रसैनिकांनी एकता व अनुशासन या तत्वाचा वापर जीवन लयबद्ध करण्यासाठी करावा. भारतीय सेनेत सहभागी होण्यासाठी एन.सी.सी. हे एक उत्तम माध्यम आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात रोजगार, स्वस्थ शरीर व आधुनिक, सामाजिक ज्ञान सुध्दा आत्मसात करण्यास राष्ट्रीय छात्रसेना उपयुक्त ठरते, म्हणुन एनसीसी शी एकनिष्ठ राहुन यशाचा मार्ग गाठा असे आवाहन त्यांनी छात्रसैनिकांना केले.