जिल्ह्यात 196 सार्वजनिक मंडळात रंगणार नवरात्रोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 12:08 IST2019-09-30T12:08:41+5:302019-09-30T12:08:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात 196 सार्वजनिक गरबा मंडळांकडून यंदा देवीची मूर्ती आणि प्रतिमेची स्थापना करुन नवरात्रोत्सव साजरा ...

Navratri festival will be held in 196 public circles in the district | जिल्ह्यात 196 सार्वजनिक मंडळात रंगणार नवरात्रोत्सव

जिल्ह्यात 196 सार्वजनिक मंडळात रंगणार नवरात्रोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात 196 सार्वजनिक गरबा मंडळांकडून यंदा देवीची मूर्ती आणि प्रतिमेची स्थापना करुन नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आह़े उत्सवासाठी जिल्हा पोलीस दलाने ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला असून यात्रोत्सवांच्या ठिकाणी विशेष नियोजन करण्यात आले आह़े 
रविवारी सकाळी खोडाई माता मंदिर व वाघेश्वरी देवी मंदिरात पारंपरिक धार्मिक उपक्रमांनी शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ करण्यात आला़ प्रामुख्याने ध्वज चढवण्याच्या उपक्रमाचा समावेश होता़ जळका बाजार परिसरातील जय संताजी जगनाडे महाराज मित्र मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त वाघेश्वरी देवीच्या मंदिरांवर ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढून युवकांनी ध्वज चढवला़ सकाळी 6.30 वाजता जळका बाजार परिसरातून  सवाद्य ध्वज मिरवणूक काढण्यात आली़ 
जळका बाजार, शिवाजी रोड, चैतन्य चौक, मोठा मारुती, धुळे चौफुली या मार्गावरून मिरवणूक वाघेश्वरी मंदिरावर गेली त्याठिकाणी ध्वज चढवण्यात आल्यानंतर मिरवणूक जाणता राजा चौक मार्गाने खोडाई माता मंदिरावर पोहचली. तेथे   भाविकांच्याहस्ते ध्वज चढवण्यात आला़ गर्दीच्या पाश्र्वभूमीवर सकाळपासून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येऊन नजर ठेवण्यात येत होती़ 

जिल्ह्यात 81 सार्वजनिक मंडळांतर्फे मूर्ती, 115 ठिकाणी प्रतिमा, दोन ठिकाणी घरगुती मूर्ती व 12 ठिकाणी खाजगी मंडळांकडून प्रतिमा स्थापन करण्यात आल्या आहेत़  नंदुरबार शहरात खोडाई माता, वाघेश्वर देवी शहादा येथील सप्तशृंगी देवी मंदिर परिसर, कोचरा माता ता़ शहादा  व म्हसावद येथे नवरात्रोत्सवानिमित्त यात्रोत्सव आहेत़ यासाठी पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनात 1 अप्पर पोलीस अधिक्षक, 3 पोलीस उपअधिक्षक, 16 पोलीस निरीक्षक, 52 सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, 183 पोलीस कॉन्स्टेबल, 91 महिला पोलीस कॉन्स्टेबलख 181 होमगार्ड, 19 महिला होमगार्ड, राज्य राखीव दलाच्या 2 तुकडय़ा, 9 स्टायकिंग फोर्स, 2 आरसीपी, 1 क्यूआरटी पथक तैनात करण्यात आल्याचे पोलीस दलाने कळवले आह़े 
 

Web Title: Navratri festival will be held in 196 public circles in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.