नवापुरात चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा केला लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:28 IST2021-03-25T04:28:38+5:302021-03-25T04:28:38+5:30

नंदुरबार : दुकानफोडीसाठी गेलेल्या चोरट्यांनी चक्क सीसीटीव्ही कॅमेराच पळविल्याची घटना नवापूर येथील शितल सोसायटी भागात घडली. एकूण रोख रकमेसह ...

In Navapur, thieves installed CCTV cameras in Lampas | नवापुरात चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा केला लंपास

नवापुरात चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा केला लंपास

नंदुरबार : दुकानफोडीसाठी गेलेल्या चोरट्यांनी चक्क सीसीटीव्ही कॅमेराच पळविल्याची घटना नवापूर येथील शितल सोसायटी भागात घडली. एकूण रोख रकमेसह साडेतेरा हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. याप्रकरणी नवापूर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनुसार, नवापुरातील शितल सोसायटी भागात धर्मेश अशोक पाटील राहतात. त्यांच्या बंद दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानातील एक मोबाइल, दोन राऊटर रोख रक्कम चोरली. त्यावर त्यांचे समाधान झाले नाही म्हणून दुकानातील सीसीटीव्ही कॅमेराच त्यांनी काढून नेत चोरला. सकाळी ही घटना लक्षात आल्यावर पोलिसांना कळविण्यात आली. एकूण १३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आल्याचा पंचनामा करण्यात आला. याबाबत धर्मेश पाटील यांनी फिर्याद दिल्याने नवापूर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार परदेशी करीत आहे.

दरम्यान, शहरात सलग दुसऱ्या दिवशी घरफोडीची घटना घडल्याने खळबळ उडाली असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शहरवासीयांकडून करण्यात येत आहे.

Web Title: In Navapur, thieves installed CCTV cameras in Lampas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.