नवापुरात एका पोल्ट्री चालकावर गुन्हा तर तीन पोल्ट्री केल्या सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:57 IST2021-02-06T04:57:54+5:302021-02-06T04:57:54+5:30

नवापूर येथे मृत कुकुट पक्ष्याबाबत प्रशासनास कोणतीही माहिती कळवली नाही. मृत पक्ष्याची परस्पर शास्रोक्त पद्धतीचा अवलंब न करता विल्हेवाट ...

In Navapur, one poultry driver was charged and three poultry were sealed | नवापुरात एका पोल्ट्री चालकावर गुन्हा तर तीन पोल्ट्री केल्या सील

नवापुरात एका पोल्ट्री चालकावर गुन्हा तर तीन पोल्ट्री केल्या सील

नवापूर येथे मृत कुकुट पक्ष्याबाबत प्रशासनास कोणतीही माहिती कळवली नाही. मृत पक्ष्याची परस्पर शास्रोक्त पद्धतीचा अवलंब न करता विल्हेवाट लावून संसर्ग साथीचे रोगाबाबत हयगय केल्याप्रकरणी पशुसंवर्धन विभागाने सुरेश दुल्लभ प्रजापत यांच्या विरोधात नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तर रात्री शहरालगतच्या चार पोल्ट्री फार्मला सील करण्यात आले. दिवसभरात पशुसंवर्धनच्या अधिकाऱ्यांनी काही पोल्ट्रीमधील दोन हजार ६५५ कोंबड्या मेल्याने त्याच पोल्ट्री फार्ममध्ये जेसीबीच्या साहाय्याने खड्डा करून पुरून परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक सह आयुक्त पशुसंवर्धन डॉ. बाबुराव नरवाडे यांनी दिली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दररोज फार्म टू फार्म कुक्कुट पक्ष्यांचा मृत्यूचा रिपोर्ट सादर करण्याचा सूचना केल्या आहेत. डायमंड व व्होरा या दोन पोल्ट्री फार्मची पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी पाहणी केली.

Web Title: In Navapur, one poultry driver was charged and three poultry were sealed