नवापुरात पुन्हा चार पोल्ट्रींचे अहवाल पॅाझिटिव्ह, ८८ हजार पक्षी केले नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:34 IST2021-02-09T04:34:52+5:302021-02-09T04:34:52+5:30

नवापूर : येथील चार पोल्ट्रीमधील कुक्कुट पक्षींचे अहवाल पॅाझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, दिवसभरात ८२ पथकाद्वारे ८८ हजार कु्क्कुट पक्षी ...

In Navapur again, four poultry reports were positive, 88,000 birds were destroyed | नवापुरात पुन्हा चार पोल्ट्रींचे अहवाल पॅाझिटिव्ह, ८८ हजार पक्षी केले नष्ट

नवापुरात पुन्हा चार पोल्ट्रींचे अहवाल पॅाझिटिव्ह, ८८ हजार पक्षी केले नष्ट

नवापूर : येथील चार पोल्ट्रीमधील कुक्कुट पक्षींचे अहवाल पॅाझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, दिवसभरात ८२ पथकाद्वारे ८८ हजार कु्क्कुट पक्षी नष्ट करण्यात आले. नाशिकच्या पथकाने २० पोल्टी मधून २० पोल्टी नमुने घेतले. दरम्यान, विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे व पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्रसिंह यांनी उपाययोजनांची पहाणी केली.

सोमवारी सहयोग, शिष, पालावाला व न्यु डायमंड या चार पोल्ट्री चे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली. त्यामुळे प्रशासनाकडून उपाययोजनांना गती देण्यात आली आहे. ८२ पथकांद्वारे दोन दिवसात एकुण ८८ हजार ३७३ कुक्कूट पक्षी नष्ट करण्यात आले. नाशिक पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने पहिल्या दिवशी दिवसभरामध्ये ५ पोल्ट्रीमध्ये जाऊन ५ मृतक कोंबड्यांचे नमुने पुणे व भोपाळ येथे पाठवण्यासाठी गोळा केले आहे. दुसऱ्या दिवशी १५ पोल्ट्रीतील १५ पक्षाचे नमुने गोळा एकूण २० नमुने पाठविण्यात आले.

दिवसभरात महसूल, पशुसंवर्धन व जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी देऊन उपाययोजनांचा आढावा घेतला.

Web Title: In Navapur again, four poultry reports were positive, 88,000 birds were destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.