नवापूरात सहा दिवसात १६ बाधितांची पडली भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 13:00 IST2020-08-10T13:00:14+5:302020-08-10T13:00:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : शहरासह तालुक्यात गत सहा दिवसात कोरोना संसर्ग झालेल्या सोळा रुग्णांची भर पडली आहे. तालुक्याची ...

नवापूरात सहा दिवसात १६ बाधितांची पडली भर
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : शहरासह तालुक्यात गत सहा दिवसात कोरोना संसर्ग झालेल्या सोळा रुग्णांची भर पडली आहे. तालुक्याची कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आता ४५ झाली आहे.आज सर्वाधिक संक्रमित १० रुग्ण निघाले आहेत.
चार आॅगस्ट रोजी विसरवाडी येथील ६९ वर्षीय महिला, पाच रोजी देवळफळी येथील १२ वर्षीय बालिका, जनता पार्क मध्ये ५२ वर्षीय पुरुष व शेफाली पार्कमध्ये ४७ वर्षीय महिला, सात रोजी चिंचपाडा येथील ४४ वर्षीय महिला, आठ रोजी खांडबारा येथील ३८ वर्षीय महिला तर रविवारी बंधारफळी पाटीलफळीत ४५ वर्षीय पुरुष, शहराच्या साईनगरी मधील ४७ वर्षीय पुरुष, नवापूर तालुक्यात रविवारी १२ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. शहरातील शेफाली पार्क मधील २०, १० आणि २८ वर्षीय पुरुष, जनता पार्क मध्ये ४७ व ५० वर्षीय महिला, २४, २८ आणि ५६ वर्षीय पुरूष, नवी भोई गल्ली मधील ३९ वर्षीय पुरुष व ग्रामीण रुग्णालय विसरवाडी येथील ३८ वर्षीय महिला अशा एकूण सोळा जणांना गत सहा दिवसात कोरोनाची लागण झाल्याची माहिती गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी दिली. कोरोना संक्रमीत रुग्ण आढळून आलेला शहरी व ग्रामीण भाग प्रशासनाने सील करुन कंटेन्मेंट झोन जाहीर केला आहे. पालिका व आरोग्य विभाग भागात औषध फवारणी करत आहे़ आरोग्य विभागाने थर्मल स्कॅनिंग सुरु केली आहे़ कोरोनावर मात करण्यासाठी नियमांचे पालन करण्याचे असे आवाहन तहसिलदार सुनिता जºहाड, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत, डॉ. शशिकांत वसावे आदींनी कळवले आहे़