नवापूर तालुक्यातील नवागाव दुचाकींचा अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2020 21:48 IST2020-11-17T21:44:55+5:302020-11-17T21:48:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : तालुक्यातील नवागाव रस्त्यावरील बेटकी गावालगत दोन मोटरसायकली समोरासमोर धडकल्याने झालेल्या अपघातात तीन युवक गंभीर ...

नवापूर तालुक्यातील नवागाव दुचाकींचा अपघात
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : तालुक्यातील नवागाव रस्त्यावरील बेटकी गावालगत दोन मोटरसायकली समोरासमोर धडकल्याने झालेल्या अपघातात तीन युवक गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली.
रोहित भिमसिंग गावीत, बादल सुनील वसावे व आणखीन एक अनोळखी युवक असे तिघे अपघातात जखमी झाल्याची माहिती आहे. जखमी युवक नवापूर तालुक्यातील चिखली व बिलबारा गावातील आहेत. तिघा जखमींना नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात घडल्याचे समजून आल्यानंतर परिसरातील नागरीकांनी रुग्णवाहिका बोलावून तिघांना रुग्णालयात रवाना केले होते. तालुक्यात तीन सीट बसवून दुचाकी चालवण्याचे प्रमाण अधिक असल्याने हे अपघात घडत आहेत.