राष्ट्रवादीचे नंदुरबारात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 21:23 IST2020-09-20T21:23:08+5:302020-09-20T21:23:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्यात १०५ आमदार निवडूनही भाजप सत्तेत न असल्याने कांदा निर्यातीवर केंद्र सरकारने बंदी लादल्याचा ...

राष्ट्रवादीचे नंदुरबारात आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्यात १०५ आमदार निवडूनही भाजप सत्तेत न असल्याने कांदा निर्यातीवर केंद्र सरकारने बंदी लादल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निरीक्षक माजी आमदार अनिल गोटे यांनी केली. शनिवारी गोटे यांच्यासह डॉ.अभिजीत मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी बाजार समितीत घुसून जोरदार घोषणाबाजी केली.
केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीतर्फे निषेध करण्यात आला. आंदोलनाचे नेतृत्व पक्ष निरीक्षक माजी आमदार अनिल गोटे यांनी केले. सकाळी ९ वाजेपासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकत्र गोळा होत होते. त्यानंतर दुपारी १२ वाजता अनिल गोटे यांचे आगमन झाल्यानंतर युवा नेते डॉ.अभिजित मोरे व पदाधिकाऱ्यांनी बाजार समितीचे बंद करण्यात आलेले गेट उघडून कार्यकर्त्यांनी आत प्रवेश करीत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी पक्ष निरीक्षक अनिल गोटे यांनी केंद्र सरकारवर टीका करीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, जून महिन्यात केंद्र सरकारने निर्यात बंदी मधून उत्पादने वगळली होती. त्यात कांद्याच्या समावेश करण्यात आला होता. त्याच वेळी केंद्राने कांदा निर्यात बंदी लागू होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. निर्यातबंदी नसल्याने जगाच्या पाठीवर शेतकरी कोठेही ही कांदा नेऊन विकू शकतो. कांदा निर्यात लागू होणार नसल्याने भारतीय जनता पार्टीने सरकारचे तोंडभरून कौतुकही केले.
परंतु, दोनच महिन्यात सरकारने कांदा निर्यातीवर बंदी लादून शेतकऱ्यांवर अन्याय केला. राज्यात भाजपचे १०५ आमदार निवडून देखील सत्ता मिळू न शकल्याने केंद्राने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याची टीका गोटे यांनी केली.
डॉ.मोरे यांनी शेतकºयांच्या मालाला नेहमी कमी भाव मिळत असतो. कोरोना महामारीमुळे सर्वात जास्त नुकसान हे शेतकºयांचे झालेले आहे. असे असताना शेतकºयांच्या कांद्याला चांगला भाव व चार पैशांच्या फायदा बळिराजाला मिळत असतांना केंद्र सरकारने शेतकरी विरोधी विधेयक आणून कांद्यावर निर्यातबंदी लादली. ज्यावेळेस शेतकरी फायद्यात असतो. त्याच वेळेस भाजपचे केंद्र सरकार शेतकºयांच्या विरोधात असा निर्णय का घेत असते? हा संशोधनाचा विषय असल्याचे डॉ.अभिजित मोरे यांनी सांगितले.
आंदोलनात पुष्पा गावित, सुरेखा वाघ, अॅड.अश्विनी जोशी, दिनेश पाटील, बी.के पाडवी, जितेंद्र खांडवे, जितेंद्र मराठे, धनराज बच्छाव, गुलाब नाईक, रविंद्र पाटील, मधुकर पाटील, महेंद्र चौधरी, गोकुळ पाटील यांच्यासह जिल्ह्यातील शेतकºयांनी सहभाग घेतला.