शहादा महाविद्यालयात बायो आंत्रप्रेनरशिप विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:35 IST2021-08-25T04:35:42+5:302021-08-25T04:35:42+5:30
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून औरंगाबाद येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. उल्हास पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचा शुभारंभ प्राचार्य प्रा. डॉ. ...

शहादा महाविद्यालयात बायो आंत्रप्रेनरशिप विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून औरंगाबाद येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. उल्हास पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचा शुभारंभ प्राचार्य प्रा. डॉ. आर. एस. पाटील यांनी केला. याप्रसंंगी प्रा. डॉ. उल्हास पाटील यांनी बायो -आंत्रप्रेनरशिप या विषयावर अत्यंत सोप्या भाषेत व अभ्यासपूर्ण व्याख्यान केले. सूत्रसंचालन जैवतंत्रज्ञान विषयाचे प्रा. डॉ. हितेंद्र जाधव यांनी केले. प्रास्ताविक जैवतंत्रज्ञान विषयाच्या विभागप्रमुख व विद्यार्थी विकास विभागाच्या संयोजिका प्रा. डॉ. मृणाल जोगी यांनी केले. यावेळी विद्यार्थी विकास विभागाचे सहायक अधिकारी प्रा. आर. एस. माळी यांनी आभार मानले.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. आर. एस. पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. उपप्राचार्य व आय. क्यु. ए. सी.चे चेअरमन डॉ. एम. के. पटेल यांनी डी. बी. टी. स्टार योजनेबद्दल मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. शिंदखेडकर व प्रा. डॉ. आर. झेड सय्यद यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याप्रसंगी प्रा. डॉ. मिलिंद पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे सहायक अधिकारी प्रा. डॉ. डी. एम. गांगुर्डे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव कमल पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील यांनी कौतुक केले.