शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
2
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
3
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
4
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
5
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
6
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
7
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
8
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
9
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
10
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
11
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
12
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
13
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
14
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
15
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
16
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
17
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
18
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
19
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 14:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्ह्यातील विविध भागात मार्गदर्शन व जनजागृतीपर उपक्रम झाले. यावेळी तहसील कार्यालयस्तरावर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्ह्यातील विविध भागात मार्गदर्शन व जनजागृतीपर उपक्रम झाले. यावेळी तहसील कार्यालयस्तरावर मतदान केंद्राधिकारी व कर्मचारी यांचा गाैरव करण्यात आला. शहादानिवडणूक प्रक्रियेत मतदानाला महत्त्व आहे. प्रत्येक पात्र नागरिकांनी मतदान केले पाहिजे. लोकशाही मजबूत करण्यासाठी अनेकांचा हातभार लागतो. निवडणुका भयमुक्त वातावरणात होतात त्यावेळीच लोकशाही मजबूत व सुदृढ होते, असे प्रतिपादन प्रांताधिकारी डॉ. चेतन सिंग गिरासे यांनी केले. शहादा तहसील कार्यालयाच्या सभागृहात राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रांताधिकारी डाॅ. गिरासे बोलत होते. कार्यक्रमात नवमतदारांना ओळखपत्र वाटप तसेच उत्कृष्ट काम केलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व कर्मचारी यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तहसीलदार डाॅ. मिलिंद कुलकर्णी, नायब तहसीलदार राजेंद्र नांदोडे, पुरवठा अधिकारी मेश्राम यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. गिरासे यांनी सांगितले की, मतदान हे लोकशाही बळकट करण्याचे महत्त्वाचे साधन आहे. बलशाली लोकशाहीसाठी निवडणूक साक्षरता या विषयावर आधारित मतदार नोंदणी आणि जागृती करण्यात आली. कोविड-१९ चा काळातही यशस्वीपणे निवडणुकांचा कार्यक्रम राबविला. यात अनेकांचा हातभार लागला. वर्षानुवर्षे नागझिरी व कोटबांधणीसारख्या गावातील मतदारांची मतदानाची समस्या होती. त्याच गावात स्वतंत्र मतदान केंद्र स्थापन केल्याने मतदारांची समस्या सुटली. नवमतदारांनी लोकशाही बळकट करण्यासाठी सहकार्य करण्याची अपेक्षा आहे. कार्यक्रमात कर्मचारी, अधिकाऱ्यांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ देण्यात आली. तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी लोकशाही निवडणूकप्रक्रियेत मतदानाचे महत्त्व विशद करून लोकशाही बळकटी करणासाठी भयमुक्त वातावरणात मतदान करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात परमेश्वर जाधव , किशोर सूर्यवंशी , शालीकराव बोरसे , शिवाजी पावरा, बुध्या पटले, तेरसिंग पावरा , गिरीश पाटील, विलास पाटील , माधुरी कांगणे , प्रमोदिनी सोनवणे , समीर अन्सारी , किशोर मोरे ,वसीम शेख या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व तहसील कार्यालयातील कर्मचारी रेखा कुवर, शेता मुळतकर, बबलू मणियार, सुनील पावरा यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला.नवापूरभारत हा जगातील सर्वांत मोठा लोकशाही पद्धती असलेला देश आहे. प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे. देशाच्या नेतृत्त्वात, सामान्य लोकांच्या समस्या सोडवण्यास, बदल घडवून आणण्यास सक्षम वाटतो, असा नेता निवडण्याचा प्रत्येक मतदाराला अधिकार असल्याचे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी महेश शेलार यांनी केले.  शहरातील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य विनोद पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी महेश शेलार, तहसीलदार मंदार कुलकर्णी, गटशिक्षणाधिकारी रमेश चौरे, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार अरविंद गावित, उपप्राचार्य कमल कोकणी आदी उपस्थित होते. यावेळी मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुननिरीक्षण कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट काम केलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. नवमतदारांना मतदान कार्ड वाटप करण्यात आले आणि वक्तृत्त्व स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.लोकशाही प्रणाली स्वीकारल्यानंतर मतदानाचे किती महत्त्व हे आपण जाणतो. एका मताला किती किंमत आहे हे समजून घेतले पाहिजे. त्यादृष्टीने मतदान करणे हा आपला अधिकार व कर्तव्य आहे. मतदार दिनाचा कार्यक्रम वेगवेगळ्या पातळ्यांवर दहा वर्षांपासून घेत आहोत. शहरातील कार्यक्रमाबरोबर तालुक्यातील जेवढी मतदान केंद्र आहेत, त्या ३३६ मतदान केंद्रांवर कार्यक्रम सुरू आहे. याद्वारे मतदारांमध्ये जनजागृती केली जात आहे, असे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी सांगितले.सिद्धेश्वर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. ज्योती कलाल यांनी सूत्रसंचालन केले. आशिष ठाकरे यांनी आभार मानले. कार्यक्रमात बटेसिंग गिरासे, सुनील बोरसे, नंदकिशोर सोनवणे, दीपमाला वळवी, अमोल जाधव, राजेंद्र बोरसे, कमलेश पाटील, असिफ अहमद हमीद सिकलकर, सिद्धेश्वर शिंदे, नरेश प्रजापत, शरदचंद्र पाटील, भरत सोनार आदींचा गाैरव करण्यात आला. प्रसंगी कर्मचारी उपस्थित हाेते. 

शहाद्यात मार्गदर्शन   शहादा शहरातील शेठ व्ही. के. शाह विद्या मंदिर व जी. एफ. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त  विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. यावेळी उपविभागीय कार्यालय तसेच तहसील कार्यालय  यांच्या संयुक्त विद्यमानाने झालेल्या  विविध स्पर्धेतील विजेत्यांना प्रशस्तीपत्र व बक्षीस देण्यात आले.  तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी तसेच नायब तहसीलदार  राजेंद्र नांदोडे, महाविद्यालयाचे प्राचार्य  आय.डी. पटेल यांनी विद्यार्थ्यांचा गाैरव केला. तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षिका आशा सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. सुषमा मराठे यांनी स्वरचित कविता सादर केली. विजयी स्पर्धकांमधून मोहित खैरनार या विद्यार्थ्याने आपले मनोगत व्यक्त केले.  सूत्रसंचालन  पी. आर. शास्त्री यांनी केले.