विधी सेवा प्राधिकरणतर्फे राष्ट्रीय लोकअदालत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:28 IST2021-07-26T04:28:17+5:302021-07-26T04:28:17+5:30
लोकअदालतीमध्ये सर्व प्रकारचे, दिवाणी, फौजदारी, मोटार अपघात दावे, कौटुंबिक हिंसाचार, चलनक्षम दस्तऐवज प्रकरणे, किरकोळ स्वरूपाची दिवाणी प्रकरणे, भूसंपादनाची संबंधित ...

विधी सेवा प्राधिकरणतर्फे राष्ट्रीय लोकअदालत
लोकअदालतीमध्ये सर्व प्रकारचे, दिवाणी, फौजदारी, मोटार अपघात दावे, कौटुंबिक हिंसाचार, चलनक्षम दस्तऐवज प्रकरणे, किरकोळ स्वरूपाची दिवाणी प्रकरणे, भूसंपादनाची संबंधित असणारे प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत.तसेच, दाखलपूर्वक प्रकरणांमध्ये सर्व प्रकारचे तडजोडक्षम प्रकरणे,यांत बॅक कर्ज, पाणीपट्टी, दूरध्वनी देयक, वीजबिल, इ. थकबाकी वसुलीची प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये यांना याद्वारे असे आवाहन करण्यात येते की, त्यांना त्यांचे अखत्यारीतील थकबाकी असणारे दाखलपूर्वक प्रकरणे ठेवावयाची असल्यास त्यांनी त्या-त्या तालुका स्तरावरील तालुका विधी सेवा समितीस व नंदुरबार मुख्यालयातील कार्यालयांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नंदुरबार येथे तातडीने संपर्क साधावा. तसेच,सर्व नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, सदर राष्ट्रीय लोकअदातीचा सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा व आपली प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालती पुढे तडजोडीद्वारे निकाली करून घेऊन वेळेची व पैशांची बचत करावी असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे करण्यात आले आहे.