रंगभूमी दिनानिमित्त नंदुरबार येथे नाट्यगृहात नटराज पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 12:35 IST2020-11-07T12:34:53+5:302020-11-07T12:35:07+5:30

n  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :   मराठी रंगभूमी दिनानिमित्त शहरातील  छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात नटराज व रंगमंच ...

Nataraja Pujan at Natyagriha at Nandurbar on the occasion of Theater Day | रंगभूमी दिनानिमित्त नंदुरबार येथे नाट्यगृहात नटराज पूजन

रंगभूमी दिनानिमित्त नंदुरबार येथे नाट्यगृहात नटराज पूजन

n  लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :   मराठी रंगभूमी दिनानिमित्त शहरातील  छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात नटराज व रंगमंच पूजन करण्यात आले.   ५ नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून नंदुरबार शहरातील जिभाऊ करंडक आयोजन समिती तर्फे  शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे एकत्र येऊन तेथील रंगमंच पूजन करण्यात आले.
यावेळी नटराज पूजन व ज्येष्ठ साहित्यिक तथा नाटककार प्रभाकर भावसार] उद्योजक किरण तडवी यांच्या हस्ते करण्यात आले. रंगमंच पूजन  रणजित राजपूत व नगरसेवक रवींद्र पवार यांनी केले. साहित्यिक प्रभाकर भावसार व उद्योजक किरण तडवी यांनी जिल्ह्यातील नाट्यकर्मींना मराठी रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा दिल्यात.  कोरोनाची पार्श्वभूमी बघता गेल्या काही महिन्यांपासून नाट्यगृह तसेच सिनेमागृह बंद होते. मात्र राज्य सरकारने मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून नाट्यगृह व सिनेमागृह उघडण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत स्वागतार्ह असल्याचे प्रतिपादन यावेळी जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजक तथा नाट्यकर्मी नागसेन पेंढारकर यांनी केले.  कार्यक्रमात नाट्यकर्मी मनोज सोनार, मनोज पटेल, रवींद्र कुलकर्णी, राहुल खेडकर, राजेश जाधव, विनोद ब्राह्मणे, जितेंद्र पेंढारकर, एस. एन. पाटील, अरुण सोनार, निलेश पवार, हेमकांत मोरे, महादू हिरणवाळे, नितीन पाटील, आशिष खैरनार आदी उपस्थित होते.

Web Title: Nataraja Pujan at Natyagriha at Nandurbar on the occasion of Theater Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.