नंदुरबार येथे नटराज व रंगमंच पूजनाचा कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 12:57 IST2019-11-06T12:57:12+5:302019-11-06T12:57:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मराठी रंगभूमी दिनानिमित्त शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाटय़मंदिरात नटराज व रंगमंच पूजन करण्यात ...

नंदुरबार येथे नटराज व रंगमंच पूजनाचा कार्यक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मराठी रंगभूमी दिनानिमित्त शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाटय़मंदिरात नटराज व रंगमंच पूजन करण्यात आले.
5 नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून नंदुरबार शहरातील नाटय़कर्मी व नाटय़कलावंतांतर्फे शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाटय़ामंदिर येथे एकत्र येऊन तेथील रंगमंच पूजन करण्यात आले. या वेळी नटराज पूजन अनिल पाटील व नाटय़कर्मी मनोज सोनार यांच्या हस्ते करण्यात आले. तर रंगमंच पूजन नाटय़कर्मी नागसेन पेंढारकर यांच्या हस्ते झाले. नंदुरबार शहरात लवकरच व्यावसायिक व प्रायोगिक नाटकांचे आयोजन करण्यात येईल. तसेच अखिल भारतीय नाटय़ परिषदेची शाखा स्थापन करण्याचा मानस नाटय़कर्मी नागसेन पेंढारकर यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे आयोजन जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजन समितीने केले होते. कार्यक्रमास नाटय़कर्मी राहुल खेडकर, तुषार ठाकरे, विनोद ब्राम्हणे, रणजित राजपूत, अहिराणी साहित्यिक विजय पाटील, योगेंद्र पाटील, आशिष खैरनार, नीलेश पवार, नितीन पाटील, रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष प्रितीश बांगड आदी उपस्थित होते.