शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

नंदुरबारात उच्चशिक्षितांनीही कोतवाल पदासाठी आजमावले नशिब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 11:31 AM

नंदुरबार : जिल्ह्यातील कोतवालांच्या रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेंतर्गत अर्ज करणा:या उमेदवारांची लेखी परीक्षा शहरातील तीन परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली़ ...

नंदुरबार : जिल्ह्यातील कोतवालांच्या रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेंतर्गत अर्ज करणा:या उमेदवारांची लेखी परीक्षा शहरातील तीन परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली़ रविवारी सकाळी 11 वाजेपासून सुरुवात झालेल्या परीक्षेस अर्ज करणा:या 1 हजार 316 उमेदवारांपैकी 1 हजार 189 परीक्षार्थीनी हजेरी लावली़ 126 रिक्त पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली़जिल्हा महसूल विभागातील कोतवालांच्या 126 सजांमधील पदे रिक्त असल्याने भरतीप्रक्रिया ऑक्टोबर महिन्यापासून सुरु करण्यात आली होती़ यांतर्गत सर्व सहा तालुक्यातून उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले होत़े यात प्रशासनाकडे 1 हजार 316 अर्ज ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झाले होत़े रविवारी शहरातील हि़गो़श्रॉफ हायस्कूल, डी़आऱहायस्कूल आणि कमला नेहरु कन्या विद्यालयात परीक्षा केंद्रांची निर्मिती करण्यात येऊन उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावण्यात आले होत़े परीक्षेसाठी महसूल विभागाकडून 230 कर्मचा:यांची नियुक्ती करण्यात येऊन तिन्ही केंद्रांवर देखरेखीसाठी दोन पथकांची नियुक्ती करण्यात आली होती़ तिन्ही केंद्रांवर दोन तास सुरु असलेली ही परीक्षा तिन्ही केंद्रांवर सुरळीत पार पडली़ दरम्यान जिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी यांनी परीक्षा केंद्रांवर जाऊन पाहणी केली़ पहिल्या टप्प्यात 75 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आल्यानंतर त्याचा निकाल जाहिर करण्यात येणार आह़े यानंतर उत्तीर्ण उमेदवारांची 25 गुणांचा मुलाखतीचा टप्पा पार पडून नियुक्त्या करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आह़े जिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी व निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनात ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आह़े परीक्षेसाठी सर्व सहा तालुक्यातून उच्चशिक्षित उमेदवारांनी अर्ज केल्याची माहिती देण्यात आली आह़े परीक्षा केंद्रातही उच्चशिक्षित उमेदवारांची संख्या अधिक होती़ सकाळी आठ वाजेपासून शहादासह दुर्गम भागातील उमेदवार दाखल झाल्याने वर्दळ दिसून आली़ परीक्षा संपेर्पयत नातेवाईक शाळांच्या बाहेर बसून होत़े परीक्षा केंद्राबाहेर तसेच केंद्रात अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात होता़ भरतीप्रक्रियेंतर्गत नंदुरबार 32, नवापूर 18, तळोदा 12, अक्कलकुवा 7, शहादा 49 तर धडगाव तालुक्यात 8 पदे भरली जाणार आहेत़ या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहिर करण्यात येणार असल्याची माहिती असून त्यानंतर मुलाखती होणार आहेत़ 126 पैकी महिलांसाठी 30 टक्के पदे महिलांसाठी आरक्षित असून प्रथमच महिला कोतवाल जिल्ह्यात काम करणार आहेत़ परीक्षेत मोठय़ा संख्येने युवती आणि महिला सहभागी झाल्याचे दिसून आल़े