नंदुरबारात उच्चशिक्षितांनीही कोतवाल पदासाठी आजमावले नशिब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 11:31 IST2018-11-19T11:31:15+5:302018-11-19T11:31:25+5:30
नंदुरबार : जिल्ह्यातील कोतवालांच्या रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेंतर्गत अर्ज करणा:या उमेदवारांची लेखी परीक्षा शहरातील तीन परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली़ ...

नंदुरबारात उच्चशिक्षितांनीही कोतवाल पदासाठी आजमावले नशिब
नंदुरबार : जिल्ह्यातील कोतवालांच्या रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेंतर्गत अर्ज करणा:या उमेदवारांची लेखी परीक्षा शहरातील तीन परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली़ रविवारी सकाळी 11 वाजेपासून सुरुवात झालेल्या परीक्षेस अर्ज करणा:या 1 हजार 316 उमेदवारांपैकी 1 हजार 189 परीक्षार्थीनी हजेरी लावली़ 126 रिक्त पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली़
जिल्हा महसूल विभागातील कोतवालांच्या 126 सजांमधील पदे रिक्त असल्याने भरतीप्रक्रिया ऑक्टोबर महिन्यापासून सुरु करण्यात आली होती़ यांतर्गत सर्व सहा तालुक्यातून उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले होत़े यात प्रशासनाकडे 1 हजार 316 अर्ज ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झाले होत़े रविवारी शहरातील हि़गो़श्रॉफ हायस्कूल, डी़आऱहायस्कूल आणि कमला नेहरु कन्या विद्यालयात परीक्षा केंद्रांची निर्मिती करण्यात येऊन उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावण्यात आले होत़े परीक्षेसाठी महसूल विभागाकडून 230 कर्मचा:यांची नियुक्ती करण्यात येऊन तिन्ही केंद्रांवर देखरेखीसाठी दोन पथकांची नियुक्ती करण्यात आली होती़ तिन्ही केंद्रांवर दोन तास सुरु असलेली ही परीक्षा तिन्ही केंद्रांवर सुरळीत पार पडली़ दरम्यान जिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी यांनी परीक्षा केंद्रांवर जाऊन पाहणी केली़ पहिल्या टप्प्यात 75 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आल्यानंतर त्याचा निकाल जाहिर करण्यात येणार आह़े
यानंतर उत्तीर्ण उमेदवारांची 25 गुणांचा मुलाखतीचा टप्पा पार पडून नियुक्त्या करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आह़े
जिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी व निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनात ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आह़े
परीक्षेसाठी सर्व सहा तालुक्यातून उच्चशिक्षित उमेदवारांनी अर्ज केल्याची माहिती देण्यात आली आह़े परीक्षा केंद्रातही उच्चशिक्षित उमेदवारांची संख्या अधिक होती़ सकाळी आठ वाजेपासून शहादासह दुर्गम भागातील उमेदवार दाखल झाल्याने वर्दळ दिसून आली़ परीक्षा संपेर्पयत नातेवाईक शाळांच्या बाहेर बसून होत़े परीक्षा केंद्राबाहेर तसेच केंद्रात अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात होता़ भरतीप्रक्रियेंतर्गत नंदुरबार 32, नवापूर 18, तळोदा 12, अक्कलकुवा 7, शहादा 49 तर धडगाव तालुक्यात 8 पदे भरली जाणार आहेत़ या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहिर करण्यात येणार असल्याची माहिती असून त्यानंतर मुलाखती होणार आहेत़ 126 पैकी महिलांसाठी 30 टक्के पदे महिलांसाठी आरक्षित असून प्रथमच महिला कोतवाल जिल्ह्यात काम करणार आहेत़ परीक्षेत मोठय़ा संख्येने युवती आणि महिला सहभागी झाल्याचे दिसून आल़े