44 अंश तापमानाने नंदुरबारकर होरपळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 12:41 IST2018-05-07T12:41:37+5:302018-05-07T12:41:37+5:30

आद्रता वाढली : उन्हाळ्यातील दुस:यांदा उच्चांकी वाढ

Nandurbar was scattered at 44 degree temperature | 44 अंश तापमानाने नंदुरबारकर होरपळले

44 अंश तापमानाने नंदुरबारकर होरपळले

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 7 : नंदुरबारात पुन्हा तापमानाने उच्चांक गाठला़ रविवारी 44 पूर्णाक 3 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली़ तसेच 29 पूर्णाक 9 टक्के आद्रता नोंदविण्यात आली़ मेच्या पहिल्याच आठवडय़ात तापमानात पुन्हा विक्रमी वाढ झाल्याने नंदुरबार चांगलेच होरपळून निघाले आहेत़
गेल्या काही दिवसांपासून तापमानात व उकाडय़ात प्रचंड वाढ होत आह़े असह्य होत असलेल्या या वातावरणाने कधी एकदाचा पावसाळा लागतोय अशी भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आह़े दिवसागणिक तापमान वाढीत नवनवीन विक्रम नोंदविले जात आहेत़ 25 एप्रिल रोजी नंदुरबारात 44 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले होत़े त्यानंतर रविवारी पुन्हा 44 पूर्णाक 3 अंशावर उष्णतेचा पारा गेला आह़े दुपारच्या वेळी मुख्य मार्गावर कमालीचा शुकशुकाट दिसून येत आह़े घरात बसूनसुध्दा उन्हाच्या तीव्र झळा जाणत आहेत़ अनेक वेळा कामानिमित्त नागरिक बाहेर पडत असतात़ त्यामुळे वाढत्या उन्हामुळे साहजिकच डोक्याला रुमाल किंवा टोपीचा वापर करण्यात येत असतो़ परंतु दुचाकीवर जात असताना तळ पाय व हातांना मोठय़ा प्रमाणात उन्हाच्या झळा जाणवत असल्याचा अनुभव वाहनधारकांकडून सांगण्यात आला़ वाढत्या उष्ण लहरींच्या प्रभावामुळे शहरीभागासह ग्रामीण भागाचेही जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आह़े वाढत्या उन्हामुळे जीवाची लाही लाही होत असून वयोवृध्दांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे सांगण्यात आल़े 
वाढत्या तापमानामुळे सर्वसामान्य नागरिक बेजार झाला आह़े घरात गारवा निर्माण करण्यासाठी अनेक नागरिकांकडून घराच्या खिडक्यांना ओला कापड बांधण्यात आला आह़े जेणेकरुन आत येणा:या उन्हाच्या झळांमुळे काहीसा दिलासा मिळणे शक्य होणार आह़े 
दरम्यान, रात्रीसुध्दा आठ वाजेर्पयत उष्ण झळा वातावरणात कायम असतात़ प्रचंड उकाडा होत असल्याने पंखे तसेच कुलरदेखील निष्क्रिय ठरत आहेत़ वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याने संतुलित व साधा आहार घेण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आह़े वाढत्या तापमानामुळे प्रकृती खालावण्याचाही मोठय़ा प्रमाणात धोका निर्माण होत आह़े
 

Web Title: Nandurbar was scattered at 44 degree temperature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.