नंदुरबारात विद्यापीठाची साहित्य कौशल्य कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 12:22 IST2019-09-21T12:22:23+5:302019-09-21T12:22:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील जिजामाता महाविद्यालयात काव्यवाचन, वक्तृत्व व वादविवाद या विषयांवर साहित्य कौशल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात ...

Nandurbar University Literacy Skills Workshop | नंदुरबारात विद्यापीठाची साहित्य कौशल्य कार्यशाळा

नंदुरबारात विद्यापीठाची साहित्य कौशल्य कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील जिजामाता महाविद्यालयात काव्यवाचन, वक्तृत्व व वादविवाद या विषयांवर साहित्य कौशल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन जिजामाता शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शोभा दिलीपराव मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यशाळेत 110 विद्याथ्र्यानी सहभाग नोंदवला.
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.टी.ए. मोरे तर प्रमुख अतिथी म्हणून सार्वजनिक महाविद्यालय विसरवाडी व उमविचे सिनेट सदस्य प्राचार्य डॉ.ए.टी. पाटील, उमविचे सिनेट सदस्य व जी.टी. पाटील महाविद्यालयाचे प्रा.डॉ.एन.बी. गोसावी, अक्कलकुवा येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाचे डॉ.एस.बी. पाटील उपस्थित होते. कार्यशाळेत व्याख्याते म्हणून अमळनेर येथील प्रताप कॉलेजचे प्रा.डॉ.रमेश माने, विधी महाविद्यालय धुळेचे सारांश सोनार, एसपीडीएम कॉलेज शिरपूरचे प्रा.डॉ.संजीव गिरासे, एसएसव्हीपीएस धुळेचे सतीश अहिरे, जीटीपी महाविद्यालयाचे प्रा.डॉ.माधव कदम यांचे मार्गदर्शन लाभले. या वेळी शोभा मोरे म्हणाल्या की, विद्याथ्र्याच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी वाचन, लेखन, चिंतनाची आवश्यकता असून यु-टय़ूब, इंटरनेट, मोबाईल या सोशलमिडीयाच्या अतिवापरामुळे युवापिढी वाचनापासून दूर जात         आहे. परिणामी आजचा युवा वर्ग दिशाहीन होत आहे. या दिशाहीन अवस्थेवर मात करण्यासाठी विद्यापीठाने आयोजित केलेल्या वादविवाद, काव्यवाचन, वक्तृत्व अशा व्यक्तिमत्त्व विकासाला बळकटी देणा:या कार्यशाळेमुळे विद्यार्थी येणा:या संकटाला सामोरे जावू शकतो, असे सांगितले.
कार्यशाळेत उत्तर महाराष्ट्रातील 40 महाविद्यालयातील सुमारे 110 विद्याथ्र्यानी सहभाग नोंदविला. प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.डी.व्ही. सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.संजय महाले यांनी तर आभार प्रा.सचिन भसारकर यांनी मानले. कार्यशाळेसासाठी प्रा.डॉ.आर.जी. मेश्राम, प्रा.डॉ.ए.बी. देशमुख, प्रा.विजय सूर्यवंशी, प्रा.डॉ.डी.के. सावंत, प्रा.व्ही.के. पंडीत, डी.बी. मराठे, एल.आर. खैरनार आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Nandurbar University Literacy Skills Workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.