शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

Nandurbar: कर्तव्यावर दारुत झिंगणाऱ्या वाहतूक नियंत्रकासह एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची ट्रिंग ट्रिंग

By भूषण.विजय.रामराजे | Updated: October 8, 2023 16:34 IST

Nandurbar News: राज्य परिवहन महामंडळाच्या अक्कलकुवा आगारात कर्तव्य बजावतानाच दारुच्या नशेत झिंगणाऱ्या वाहतूक नियंत्रकासह दोन वाहक, चालक, स्वच्छक आणि लिपिकाला निलंबित करण्यात आले आहे.

- भूषण रामराजेनंदुरबार - राज्य परिवहन महामंडळाच्या अक्कलकुवा आगारात कर्तव्य बजावतानाच दारुच्या नशेत झिंगणाऱ्या वाहतूक नियंत्रकासह दोन वाहक, चालक, स्वच्छक आणि लिपिकाला निलंबित करण्यात आले आहे. आगारप्रमुखाला मारहाण केल्याच्या प्रकारानंतर विभाग नियंत्रकांनी ही कारवाई केली आहे.अक्कलकुवा आगारातील कर्मचाऱ्यांनी मद्यप्राशन केल्याच्या तक्रारी वेळाेवेळी समोर आल्या होत्या. यातून आगार व्यवस्थापकाला मद्यधुंद अवस्थेतील निलंबित दोन वाहकांनी मारहाण केली होती. यातून आगारातील स्थितीचा आढावा घेत विभाग नियंत्रक विजय गिते यांनी याठिकाणी भेट दिली होती.

यावेळी वाहतूक नियंत्रक विनायक वाल्मीक साबळे, वाहक मनोज प्रताप पवार, वाहक सतीश नाथराव मुंडे हे कर्मचारी कर्तव्यावर असताना मद्यपान केलेल्या स्थिती आढळून आल्याने त्यांना जागेवर निलंबित करण्यात आले. दरम्यान आगार प्रशासनाचे आगार झुगारणाऱ्या चालक गजानन चंद्रभान सलाम, लिपिक तुकाराम रामकृष्ण कोळी व स्वच्छक सुभाष गंगा भिल यांनाही निलंबित करण्यात आले आहे.काही महिन्यांपूर्वी मोलगी ते अक्कलकुवा दरम्यान घाटामध्ये चालक मद्यधुंद अवस्थेत बस चालवत असल्याच्या गंभीर प्रकारही प्रवाशांनी समोर आणला होता. यातून आगारातील कर्मचाऱ्यांच्या मद्यपानाचे अनेक किस्सेही समोर येत होते. यादरम्यान निलंबित वाहकांनी आगार प्रमुखाला मारहाण केल्याने प्रकरणाचे गांभिर्य वाढले होते.

टॅग्स :state transportएसटीEmployeeकर्मचारी