नंदुरबार तालुका विज्ञान प्रदर्शनाचा तिलालीत समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 12:48 IST2019-12-27T12:48:07+5:302019-12-27T12:48:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील तिलाली येथील जीटीपी कन्या विद्यालयात नंदुरबार तालुका विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनात ...

नंदुरबार तालुका विज्ञान प्रदर्शनाचा तिलालीत समारोप
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील तिलाली येथील जीटीपी कन्या विद्यालयात नंदुरबार तालुका विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनात विविध गटातून निवड झालेल्या उपकरणांची जिल्हा विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली.
प्रदर्शनात निवड झालेली उपकरणे अशी : विद्यार्थ्याचे नाव, शाळा व कंसात उपकरणाचे नाव- जि.प. केंद्र गटात प्रथम कविता विजय आव्हाड, जि.प. शाळा रनाळे (पाण्याची साठवण), द्वितीय गणेश धरम माळसे, प्राथमिक विद्या मंदिर कोकणीहिल (वीज व इंधन विरहीत चक्की), तृतीय नेहा विजय वळवी, जि.प. शाळा वसलाई (कार लिफ्टर). जि.प. केंद्र राखीव गटात जतन जयदेव ठाकरे, जि.प. शाळा कोठली खुर्द (स्वच्छता एक्सप्रेस). उच्च प्राथमिक गटात प्रथम वेदांत तारकेश्वर पटेल, अभिनव विद्यालय नंदुरबार (राईट अँगल बॉक्स), द्वितीय नीलेश संजय पाटील, पुतळाबाई गजमल विद्यालय वैंदाणे (मदरगार्ड), तृतीय विवेक विनोद सोनवणे, एस.मिशन हायस्कूल (अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम) व राहुल दिलीप मराठे, इंदाणी विद्यालय कोपर्ली (स्वयंचलित पाणी देणारे यंत्र). प्राथमिक राखीव गटात दिपेश मुरलीधर बहिरम, एकलव्य विद्यालय नंदुरबार (स्मोक गॅस लीक अलार्म सेफ्टी डिवाईस).
माध्यमिक गटात प्रथम पूजा अशोक राठोड, एस.ए. मिशन हायस्कूल नंदुरबार (स्मार्ट आॅटोमॅटीक हाऊस), द्वितीय मिरजा उमामा साजीद, अँग्लो उर्दू कनिष्ठ महाविद्यालय नंदुुरबार (सेफ हॅण्ड हेवी सिटी), तृतीय क्रमांक सोमेश महेश जोशी, डी.आर. हायस्कूल नंदुरबार (प्ले विथ ट्रिमिट्री) व वैष्णवी भास्कर मिस्तरी, जीटीपी कन्या विद्यालय तिलाली (औषध आठवण करून देणारे उपकरण) तर माध्यमिक राखीव गटात करण सुदाम वळवी (देवमोगरा विद्यालय वसलाई (तुषार सिंचन) या उपकरणांची निवड करण्यात आली.
समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तिलाली येथील सावंत विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष नारायण पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी एम.व्ही. कदम, गटशिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी, विस्तार अधिकारी डी.जी. वसावे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील, कार्याध्यक्ष कुंदन पाटील, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष कपूरचंद मराठे, सचिव खान फय्याज एम.खान, माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव एस.एन. पाटील, मुख्याध्यापिका के.एन. बाविस्कर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक कपूरचंद मराठे, सूत्रसंचालन एस.जी. सोनवणे तर आभार कुंदन पाटील यांनी मानले.