नंदुरबार तालुका कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक संघटनेची कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:36 IST2021-09-24T04:36:03+5:302021-09-24T04:36:03+5:30

कार्यकारिणीची निवड संघटनेचे ज्येष्ठ सभासद प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली श्रीमती हि.गो. श्रॉफ कनिष्ठ महाविद्यालयात झालेल्या सभेत सर्वानुमते करण्यात झाली. ...

Nandurbar taluka junior college professors association executive announced | नंदुरबार तालुका कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक संघटनेची कार्यकारिणी जाहीर

नंदुरबार तालुका कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक संघटनेची कार्यकारिणी जाहीर

कार्यकारिणीची निवड संघटनेचे ज्येष्ठ सभासद प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली श्रीमती हि.गो. श्रॉफ कनिष्ठ महाविद्यालयात झालेल्या सभेत सर्वानुमते करण्यात झाली. बैठकीला जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.राजेद्र शिंदे व प्रा.बबन बागूल उपस्थित होते. बैठकीत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात तालुका अध्यक्ष प्रा. प्रशांत बागूल, कार्याध्यक्ष प्रा.खुशाल साठे व सचिव प्रा. संजय मराठे, शहर विभाग उपाध्यक्ष प्रा. तुषार पाटील, ग्रामीण विभाग उपाध्यक्ष प्रा. दिलीप सोलंकी, सहसचिव प्रा.सोहेल खान हनीफ पठाण, विनाअनुदानित प्रतिनिधी प्रा.घनशाम सोनावणे, महिला प्रतिनिधी प्रा.सांजोक्ता गिरासे, मार्गदर्शक प्रा.प्रमोद सूर्यवंशी, प्रा.सुनील सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली. बैठकीला संघटनेचे जिल्हा सचिव प्रा.एस.एन. पाटील, प्रा.अंकुश रघुवंशी, प्रा.राजेद्र बागूल, प्रा.असिफ शहा, प्रा.सुनीता शिंदे, प्रा.प्रकाश गवळे, प्रा.भरत चव्हाण उपस्थित होते. प्रा.अनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षक हितासोबत विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचा मानस नवनिर्वाचित कार्यकरिणीने व्यक्त केला. सूत्रसंचालन प्रा.दिलीप सोलंकी यांनी केले.

Web Title: Nandurbar taluka junior college professors association executive announced