नंदुरबारच्या विद्याथ्र्याचा मित्रांनीच केला खून

By Admin | Updated: July 9, 2017 12:52 IST2017-07-09T12:52:03+5:302017-07-09T12:52:03+5:30

या प्रकरणी दोघं अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे.

Nandurbar student's friend murdered | नंदुरबारच्या विद्याथ्र्याचा मित्रांनीच केला खून

नंदुरबारच्या विद्याथ्र्याचा मित्रांनीच केला खून

 ऑनलाईन लोकमत

 
नंदुरबार, दि.9 -  शहरातील एका शाळेत शिकणारा राज नंदकिशोर ठाकरे (15) रा.एकलव्य नगर या विद्याथ्र्याचा त्याच्या मित्रांनीच खून केल्याचे तपासात समजले असून त्यांनी कबुलीदेखील दिली आहे. या प्रकरणी दोघं अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे. 
शाळकरी 15 वर्षीय मुलाचा मृतदेह खामगाव रस्त्यावर संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली होती.    राज नंदकिशोर ठाकरे  हा मुलगा गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होता. याबाबत शहर पोलिसात अपहरणाची नोंद करण्यात आली होती. शनिवारी सकाळी खामगाव रस्त्यावर या मुलाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या गळ्यावर जखमा आढळून आल्याने घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास केला असता राजच्या दोन अल्पवयीन मित्रांनीच त्याचा खून केल्याचे समोर आले आहे. खून केल्यानंतर या मित्रांनी राजच्याच घरी चोरीदेखील केली होती. 

Web Title: Nandurbar student's friend murdered